War मॉक ड्रिल म्हणजे काय... सायरन वाजायला लागला की नेमकं काय करायचं?
भारत-पाकिस्तानधील युद्धाची परिस्थिती लक्षात घेऊन भारतात 7 मे रोजी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलं आहे. यावेळी नेमकं काय करायचं हे आता आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
ADVERTISEMENT

मुंबई: वॉर मॉक ड्रिल (War Mock Drill) म्हणजे युद्ध किंवा आपत्कालीन परिस्थितीच्या तयारीसाठी उद्या (7 मे) आयोजित केला जाणारा सराव. यामध्ये युद्ध, हवाई हल्ला, दहशतवादी हल्ला, नैसर्गिक आपत्ती यासारख्या परिस्थितींचा सामना करण्यासाठी प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि नागरिक यांची तयारी तपासली जाते.
मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश
सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमता तपासणे: पोलीस, अग्निशमन दल, NDRF (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल), SDRF (राज्य आपत्ती निवारण दल), आणि नागरी संरक्षण पथक किती जलद आणि प्रभावीपणे प्रतिसाद देतात हे पाहणे.
नागरिकांची तयारी: आपत्कालीन परिस्थितीत सामान्य लोक कसे वागतात, त्यांना सुरक्षित ठिकाणी कसे हलवता येते, आणि त्यांचे मनोबल कसे उंचावता येते याची चाचणी.
सुरक्षा साधनांचे मूल्यमापन: सायरन, अलर्ट सिस्टम, संचार यंत्रणा आणि इतर साधने किती प्रभावी आहेत याची तपासणी.










