Personal Finance: नोकरी लागल्यानंतर 'या' 5 चुका करणं टाळा; नाहीतर व्हाल कर्जबाजारी!
Personal Finance Tips: नोकरी मिळाल्यानंतर पगाराचं व्यवस्थापन योग्यरित्या झालं नाही तर महिन्याभराच्या खर्चासाठी पगार तर कमी वाटेलच पण त्यासोबतच कर्जाचं ओझं देखील वाढत जाईल. त्यामुळे नोकरी लागल्यानंतर 'या' 5 चुका तुम्हाला कर्जबाजारी बनवू शकतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नोकरी लागल्यानंतर 'या' 5 चुका बनवतील कर्जबाजारी

सॅलरी मॅनेजमेंटच्या 'या' टीप्स जाणून घ्या

नोकरी करणाऱ्यांसाठी पगाराच्या व्यवस्थापनाच्या टिप्स
Personal Finance: एक चांगल्या पगाराची नोकरी किंवा एखादा बिझनेस, स्टार्टअप सुरू करावा, असं प्रत्येक तरुणाचं ध्येय असतं. मात्र, नोकरी मिळाल्यानंतर सॅलरी मॅनेजमेंट हा महत्त्वाचा भाग असतो. जर पगाराचं व्यवस्थापन योग्यरित्या झालं नाही तर महिन्याभराच्या खर्चासाठी पगार तर कमी वाटेलच पण त्यासोबतच कर्जाचं ओझं देखील वाढत जाईल. त्यामुळे नोकरी लागल्यानंतर 'या' 5 चुका तुम्हाला कर्जबाजारी बनवू शकतात.
आजचे तरुण हे नोकरी लागल्यानंतर सॅलरी मॅनेजमेंट करताना काही लहानसहान चुका करतात. मात्र, या चुकांमुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे नोकरी करता करता वर्षे निघून जातात मात्र, अशा लहान चुकांमुळे नोकरी करता करता वर्षे निघून गेली तरी पुरेशा सेव्हिंग्स होत नाहीत आणि पैसे देखील उरत नाहीत. याउलट, योग्यरित्या फायनँशियल मॅनेजमेंटवर फॉकस करुन स्वप्न पूर्ण करता येतात.
'या' 5 चुका करणं टाळा
1. पगार येताच खर्च करायला सुरूवात (No Budgeting)
पगाराचं मॅनेजमेंट न करता खर्च करण्यास सुरूवात केल्याने खर्चावर नियंत्रण ठेवता येत नाही.
परिणामी, सेव्हिंग्स होत नाहीत आणि शेवटी कर्ज घेण्याची वेळ येते.
2. इमरजेंसी फंडिंग न बनवणे
अनेकदा, अचानक नोकरी जाणे, आजारी पडणे, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला वैद्यकीय गरज भासणे, यासारख्या समस्या उद्भवतात.
या सगळ्यासाठी इमरजेंसी म्हणजेच आपात्कालीन फंड असणं आवश्यक आहे.
हे ही वाचा: हळदीच्या रात्री बाथरूममध्ये गेली अन् दीक्षा जिवंत परत आलीच नाही, आतमध्ये काय घडलं?
3. क्रेडिट कार्डचा निष्काळजीपणे वापर
कमीत कमी पेमेंट करणे, मर्यादेपेक्षा जास्त खर्च करणे आणि वेळेवर बील न भरणे, यासारख्या सवयी क्रेडिट स्कोर बिघडवण्याला कारणीभूत ठरू शकतात.
4. रिसर्च केल्याशिवाय विमा आणि गुंतवणूक करणे
चुकीची पॉलिसी घेतल्याने किंवा फक्त कर वाचवण्यासाठी गुंतवणूक केल्याने फायद्याऐवजी तोटाच होतो.
5. EPF, ग्रेच्युटी आणि कंपनी बेनेफिट्सकडे दुर्लक्ष करणे
EPF, ग्रेच्युटी आणि कंपनी बेनेफिट्स दीर्घकाळासाठी खूप उपयुक्त आहेत, परंतु लोक सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष करतात.
हे ही वाचा: कपडे विक्रीसाठी फुटपाथवरील स्टॉलवरून तरुणावर ठाण्यात गोळीबार, पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं...
नोकरी लागल्यानंतर 'ही' 5 कामं नक्की करा
1. योग्यरित्या पगाराचं मॅनेजमेंट (50-30-20 रूल)
- 50 टक्के आवश्यक गरजा (भाडं, खाणं आणि प्रवास)
- 30 टक्के इच्छेनुसार गरजा (खरेदी, प्रवास)
- 20 टक्के बचत आणि गुंतवणूक (SIP, इमरजेंसी फंड)
2. इमरजेंसी फंड कसं बनवावं?
- कमीत कमी 3 ते 6 महिन्यांच्या पगाराला अनुसरून फंड बनवा.
- हे वेगळ्या सेव्हिंग अकाउंट किंवा लिक्विड फंडमध्ये ठेवा जेणेकरुन गरजेनुसार, लगेच मिळतील.
3. स्वास्थ्य आणि जीवन वीमा घ्या (Health and Term Insurance)
- नोकरीच्या सुरुवातीच्या काळात हे स्वस्त मिळते.
- भविष्यातील मोठ्या अडचणींपासून वाचवते.
4. SIP किंवा PPF सारख्या गुंतवणूकीला सुरूवात
- लहान रकमेपासून सुरूवात करा आणि सतत रक्कम वाढवत राहा.
- कालांतराने कंपाउंडिंगचा फायदा मिळेल.
5. आपले क्रेडिट स्कोर मेंटेन करा
- वेळेवर बील भरा.
- EMI मिस करु नका.
- आवश्यकतेनुसार, अधिक कर्ज घेऊ नका.