जिद्द पूर्ण केली, वयाच्या 56 व्या वर्षी 12 वी पास! अंगणवाडी सेविकांनी किती मार्क मिळवले?

मुंबई तक

काल घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वी परीक्षेच्या निकालात कुडाळमधील अंगणवाडी सेविकांनी चांगलंच यश संपादन केल्याचं समोर आलं आहे. वयाच्या 56 व्या वर्षी नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून त्या 12 वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत.

ADVERTISEMENT

कुडाळच्या अंगणवाडी सेविकांचं 12 वीच्या परीक्षेत यश
कुडाळच्या अंगणवाडी सेविकांचं 12 वीच्या परीक्षेत यश
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वयाच्या 56 व्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण

point

अंगणवाडी सेविकांचं बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

point

अंगणवाडी सेविकांनी वयाच्या 56 व्या वर्षी संपादन केलं यश

सातारा: 5 मे रोजी म्हणजे कालच महाराष्ट्र शासनाच्या 12 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील कुडाळा गावाच्या तीन अंगणवाडी सेविकांनी 12 वीच्या परीक्षेत  उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. यामधील सुवर्णा विनायक पवार यांनी परीक्षेत 50.83 टक्के मिळाली. तसेच, जयश्री प्रकाश कांबळे 42.50 टक्के मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. 

रचला इतिहास

या दोन्ही अंगणवाडी सेविकांनी वयाच्या 56 व्या वर्षी 12 वी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन अनोखा इतिहास रचला. तसेच, त्यांच्या सहकारी सीमा संतोष कारळे यांनी सुद्धा 42.50 टक्के प्राप्त करुन परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. 

हे ही वाचा: बारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांचंही मोठं यश, तब्बल 92.38 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय

या महिलांनी फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेळ वाया न घालवता आपलं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या अगदी 56 व्या वर्षी त्यांनी त्यांचे स्वप्न साकार केले आणि शिक्षणासाठी वयाची मर्यादा नसते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. 

आजची तरुण पिढी ही सोशल मीडिया आणि फेम मिळवण्याच्या प्रयत्नात बुडालेली असताना, त्याच वेळी या अंगणवाडी सेविकांनी आपली नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून आपल्या कठोर परिश्रम आणि शिक्षणाप्रति समर्पणाच्या जोरावर हे यश संपादन केलं आहे. 

हे ही वाचा: Maharashtra Board 10th Result 2025: बारावीचा निकाल तर लागला आता 10 वीचा निकाल 'या' तारखेपर्यंत होणार जाहीर?

कुटुंबीयांचा पाठिंबा

त्यांच्या या उल्लेखनीय यशामागे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मोठा पाठिंबा मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या प्रेरणादायी कामगिरीचे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय पातळीवर खूप कौतुक होत आहे. शिक्षणाची इच्छा असलेल्या सर्वांसाठी या अंगणवाडी सेविका प्रेरणास्थान ठरल्या आहेत.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp