HSC Result 2025 : संपूर्ण महाराष्ट्रात मिताली काबराचीच चर्चा! बारावीच्या परीक्षेत किती टक्के गुण मिळाले?
Maharashtra HSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बारावी 2025 चा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यात बारावीचा निकाल किती टक्के लागला?

कोणत्या जिल्ह्यात किती टक्के निकाल लागला?

मिताली काबराला किती टक्के गुण मिळाले?
Maharashtra HSC Result 2025, जका खान, वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बारावी 2025 चा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील तोरणाला येथील ममता इंग्लिश स्कूलची विद्यार्थी मिताला काबराने 12 वी सायन्समध्ये 600 पैकी 594 गुण मिळवले. त्यामुळे मितालीला या परीक्षेत 99 टक्के गुण मिळाले आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती टक्के निकाल लागला?
मितालीचे वडील चार्टर्ड अकाऊंटन्ट (CA) आहेत. तर मितालीची आई संभाजी नगरच्या इंजीनियरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. आई-वडिलांच्या आशीर्वादामुळेच परीक्षेत 99 टक्के गुण मिळवण्यात यश आलं, असं मितालीने म्हटलं आहे. निकालाबाबत सविस्तर माहिती अशी की, कला विभागात 80.52 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर वाणिज्य विभागात 92.68 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
हे ही वाचा >> डोळ्यात अश्रू, काळजात राग घेऊन परीक्षा दिली, वैभवीनं 12 वीला किती टक्के मिळवले?

तर विज्ञान शाखेत 97.35 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण (96.74%), कोल्हापूर (93.64 %), मुंबई (92.93 %), संभाजीनगर (92.24 %), अमरावती (91.43 %), पुणे (91.32 %), नाशिक (91.31 %), नागपूर (90.52 %), लातूरमध्ये (89.46 %) इतका रिझल्ट लागला आहे.
राज्यात कोकण विभागाने निकालात बाजी मारली आहे. तर कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर मुंबई, चौथ्या क्रमांकावर छत्रपती संभाजी नगर, अमरावती पाचव्या क्रमांकावर तर पुणे विभाग सहाव्या क्रमांकावर आहे.