मोठ्या बहिणीने बॉयफ्रेंडच्या मित्राला सांगितलं, '2 लहान बहि‍णींवर बलात्कार कर आणि...' नंतर तरूणीने स्वत:...

मुंबई तक

Today Viral News : उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच घरात राहणाऱ्या चार बहिणींपैकी थोरल्या बहिणीने 22 एप्रिलला स्वत:चं जीवन संपवलं.

ADVERTISEMENT

Uttar Pradesh Viral News
Uttar Pradesh Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये धक्कादायक घटना घडली

point

तरुणीने बहिणींना धमकी देत स्वत:ला संपवलं

point

काय आहे नेमकं प्रकरण?

Today Viral News : उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच घरात राहणाऱ्या चार बहिणींपैकी थोरल्या बहिणीने 22 एप्रिलला स्वत:चं जीवन संपवलं. परंतु, या प्रकरणात खळबळजनक खुलासा समोर आला आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळं सर्वांनाच हादरा बसला आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीच्या प्रियकराच्या मित्राने तिच्या दोन्ही लहान बहिणींवर अत्याचार केला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या बहिणीचं तिच्या प्रियकरासोबत प्रेमसंबंध होते. तिचं नातं उघडकीस येऊ नये, यासाठी तरुणीने तिच्या प्रियकराच्या मित्राला लहान बहिणींसोबत अत्याचार करायला सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीने तिच्या सख्ख्या बहिणींना धमकीही दिली होती. जर याबाबत कोणाला सांगितलं, तर ती स्वत:चं जीवन संपवेल, असं तिने म्हटलं होतं. परंतु, दोन्ही बहिणींनी त्यांच्या मोठ्या बहिणीला स्पष्ट सांगितलं की, त्या दोघीही काकीला घडलेल्या प्रकाराबाबत सांगणार आहेत. या भीतीमुळे 22 एप्रिलच्या दिवशी या तरुणीने स्वत:चं आयुष्य संपवलं. 

काय आहे नेमकं प्रकरण?

ही धक्कादायक घटना कानपूरच्या फजलगंज येथे घडली. इथे एका महिलेचा मृत्यू 8 वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर या महिलेची सासू तिच्या तिन्ही मुलींचं पालन पोषण करत होती. एका तरुणीचं प्रेमसंबंध घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणाच्या मित्राशी होते. त्यानंतर ही तरुणी तिच्या प्रियकराला गुपचूप घरी बोलवायची. परंतु, या प्रकाराबाबत तरुणीच्या दोन्ही बहिणींना समजलं आणि त्यांनी या प्रेमप्रकरणाला विरोध केला.  

हे ही वाचा >> डोळ्यात अश्रू, काळजात राग घेऊन परीक्षा दिली, वैभवीनं 12 वीला किती टक्के मिळवले?

रिपोर्टनुसार, या तरुणींची आजी राजस्थानच्या मंदिरात दर्शनासाठी गेली होती. त्यानंतर मोठ्या बहिणीने तिच्या प्रियकराला घरी भेटण्यासाठी बोलावलं. छोट्या बहिणींनी त्यांची थोरली बहीण आणि तिच्या प्रियकराला पाहिलं. त्यानंतर या तरुणींना त्यांच्या थोरल्या बहिणीला सांगितलं की, हा सर्व प्रकार आम्ही आजीला सांगणार आहोत. यामुळे ती तरुणी भयभीत झाली आणि प्रियकराच्या मित्राला घरी बोलावून दोन्ही बहिणींसोबत अत्याचार करायला सांगितलं.

हे ही वाचा >> Maharashtra HSC Result 2025: 12वीचा निकाल मोबाइल आणि वेबसाइटवर कसा पाहाल?

धक्कादायक, म्हणजे या तरुणीने तिच्या बहिणींना धमकीही दिली. या प्रकाराबाबत कोणाला सांगितलं तर मी स्वत:ला संपवून टाकेन आणि दोघींनाही अडकवेन. पण त्यानंतर ही तरुणी खूप घाबरली आणि तिने आत्महत्या केली. या संपूर्ण प्रकरणाबाबत एडीसीपी राजेश कुमार श्रीवास्तव यांनी म्हटलं की, 22 एप्रिलच्या दिवशी या तरुणीने (थोरली बहीण) आत्महत्या केली. आता दोन्ही छोट्या बहिणींनी त्यांच्या आजीला घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. दोघींनाही वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आलं आहे. सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

 

हे वाचलं का?

    follow whatsapp