बारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांचंही मोठं यश, तब्बल 92.38 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही राज्याच्या निकालापेक्षा एक टक्का जास्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांचंही मोठं यश

यंदा 7,258 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले
Maharashtra State Board Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदा राज्यभरातून 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी 13 लाख 02 हजार 873 विद्यार्थी, म्हणजेच 91.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे, यंदाच्या निकालात दिव्यांग, रिपीटर्स आणि खासगी विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीने विशेष छाप पाडली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही राज्याच्या निकालापेक्षा एक टक्का जास्त आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट निकाल
हे ही वाचा >> "तुझे वडील संतोष देशमुख यांना किती...", CM फडणवीस यांचं वैभवीला भावनिक पत्र, काय शब्द दिला?
यंदा 12वीच्या परीक्षेसाठी एकूण 7,310 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 7,258 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. यातील तब्बल 6,705 विद्यार्थ्यांनी यश मिळवत 92.38% उत्तीर्ण टक्केवारी नोंदवली. ही उल्लेखनीय कामगिरी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे आणि मंडळाच्या समावेशक शिक्षण धोरणाचंच हे द्योतक आहे.
पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी कशी?
पहिल्यांदा नापास झाल्यामुळे पुन्हा परीक्षा देणाऱ्या (रिपीटर्स) विद्यार्थ्यांच्या बाबतीत, एकूण 42,388 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 42,024 विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी 15,823 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ज्यामुळे पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची उत्तीर्ण टक्केवारी 37.65% इतकी राहिली. ही टक्केवारी तुलनेनं कमी असली तरी, विद्यार्थ्यांनी यशस्वी होत आपली मेहनत आणि दृढनिश्चय दाखवला आहे.
हे ही वाचा >> Maharashtra Board 10th Result 2025: बारावीचा निकाल तर लागला आता 10 वीचा निकाल 'या' तारखेपर्यंत होणार जाहीर?
महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले, “दिव्यांग, पुनरावृत्ती आणि खासगी विद्यार्थ्यांच्या यशामुळे आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्या यशामागे शिक्षक, पालक आणि मंडळाच्या सुविधांचा मोठा वाटा आहे. आम्ही सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.”