HSC Result 2025 : 12 वीचा विभागनिहाय निकाल जाहीर, कोकण आणि पुण्याचा नंबर कितवा?

मुंबई तक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होईल. मात्र, विभागनिहाय आकडेवारी पत्रकार परिषदेत समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोकणाचीच बाजी

point

मुंबई दुसऱ्या क्रमांकावर, तिसरा नंबर कुणाचा?

Maharashtra HSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावी 2021 निकाल (Maharashtra HSC result 2021) जाहीर करण्यात आला आहे. दुपारी 1 वाजता बोर्डाने संपूर्ण राज्याचा निकाल जाहीर केला. यंदा एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे.

हे ही वाचा >> HSC 12th Board Result : निकाल पाहण्यासाठी 9 वेबसाईटची यादी! साईट डाऊन झाली तरी नो टेन्शन


शाखानिहाय निकाल (HSC Result : Streamwise Result)

कला (Arts) – 80.52 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते

वाणिज्य (Commerce) – 92.68 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले

विज्ञान (Science) – 97.35 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

व्यावसायिक अभ्यासक्रम (Vocational courses) – 83.26 टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले होते.


विभागनिहाय निकाल 

कोकण – 96.74%

कोल्हापूर – 93.64%

मुंबई – 92.93%

संभाजीनगर – 92.24%

अमरावती – 91.43%

पुणे – 91.32%

नाशिक – 91.31%

नागपूर – 90.52%

लातूर – 89.46%

कोकण पुन्हा एकदा राज्यात अव्वल स्थानावर असून, त्यानंतर कोल्हापूरचा नंबर आहे. तिसऱ्या क्रमांकावर मुंबई तर चौथ्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगरचा नंबर आहे. तर पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर अमरावती आणि पुणे विभागाचा नंबर आहे. तर त्यानंतर नाशिक, नागपूर आणि अमरावती विभाग आहेत. तर लातूर शेवटच्या क्रमांकावर आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp