Maharashtra Board 10th Result 2025: बारावीचा निकाल तर लागला आता 10 वीचा निकाल 'या' तारखेपर्यंत होणार जाहीर?
Maharashtra Board 10th Result Date: बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता 10वीचा निकाल कधी लागणार याकडेच सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
ADVERTISEMENT

पुणे: महाराष्ट्र बोर्डाच्या 12वीच्या निकाल अखेर आज (5 मे 2025) जाहीर झाला. फेब्रुवारी 2025 ते मार्च 2025 या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा 12 वीचा निकाल हा लवकर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता 10 वीचा निकाल देखील लवकरच जाहीर होईल. असं अंदाज वर्तविण्यात येत आहे.
बारावीचा निकाल आज जाहीर झाल्यानंतर आता 10 वीच्या परीक्षेचा निकाल हा 15 मे पर्यंत जाहीर केला जाऊ शकतात. मागील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये, बारावीचे निकाल 21 मे रोजी आणि दहावीचे निकाल 27 मे रोजी जाहीर झाले.
हे ही वाचा>> SSC Result 2025: दहावीचा निकाल पाहण्याची तयारी करून ठेवा, इथे पाहू शकता Result
लाखो विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची वाट पाहत आहेत. त्यांची प्रतीक्षा ही पुढील आठवड्यात संपू शकते. बारावीच्या निकालाची तारीख ही काल (4 मार्च) जाहीर करण्यात आली होती. ज्यानंतर आज (5 मे) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्याचप्रमाणे 10 वीच्या निकालाची नेमकी तारीख देखील आदल्या दिवशीच जाहीर केली जाईल.
गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर, साधारणपणे महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीचे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जातात. पण यंदापासून हे निकाल लवकरच जाहीर करण्याचं बोर्डाचं धोरण आहे.










