हळदीच्या रात्री बाथरूममध्ये गेली अन् दीक्षा जिवंत परत आलीच नाही, आतमध्ये काय घडलं?

मुंबई तक

उत्तर प्रदेशातील बदायू येथील इस्लाम नगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिथे राहणाऱ्या 22 वर्षीय दिक्षाच्या घरी तिच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच लग्नाच्या आदल्या रात्रीच तिचा मृत्यू झाला. रात्री 12:30 वाजता दिक्षा बाथरूममध्ये गेली मात्र, त्यानंतर तिथेच ती मृतावस्थेत आढळली.

ADVERTISEMENT

हळदीच्या रात्री बाथरूममध्ये गेली अन् दीक्षा जिवंत परत आलीच नाही
हळदीच्या रात्री बाथरूममध्ये गेली अन् दीक्षा जिवंत परत आलीच नाही
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हळदीच्या रात्री बाथरुममध्ये गेली अन् मृतावस्थेत सापडली

point

लग्नाच्या आदल्या दिवशी नवरीचा मृत्यू

point

बाथरुममध्ये गेल्यानंतर तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

UP News: उत्तर प्रदेशातील बदायू येथील इस्लाम नगरमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय दिक्षाच्या घरी तिच्या लग्नाची तयारी सुरू होती. कुटुंबातील सर्वच सदस्य मुलीच्या लग्नात व्यस्त होते. दिक्षाच्या लग्नामुळे सर्वच कुटुंबीय अगदी आनंदात होते. दिक्षाच्या घरात तिच्या लग्नाच्या प्रसंगी नाचगाणेही सुरू होते. मात्र ज्या घरातून तिची डोली निघणार होती, त्याच घरातून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. लग्नाच्या आदल्या रात्री दिक्षासोबत नेमकं काय घडलं? हे जाणून सर्वांनाच धक्का बसेल. 

खरंतर, लग्नाच्या आदल्या रात्रीच दिक्षाचा मृत्यू झाला. दिक्षाचा मृत्यूमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. रात्री 12:30 वाजता दिक्षा बाथरूममध्ये गेली मात्र, त्यानंतर तिथेच ती मृतावस्थेत आढळली. ज्यावेळी दिक्षा बाथरूममध्ये गेली त्यावेळी ती प्रचंड घाबरली. त्यावेळी दिक्षा बेशुद्ध झाली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. 

मुरादाबादवरुन येणार होती वरात

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या लग्नाची वरात ही मुरादाबादहून येणार होती. इस्लामनगर पोलीस स्टेशन परिसरातील नूरपूर पिनोनी येथील रहिवासी दिनेश पाल सिंग यांची 22 वर्षीय मुलगी दिक्षाच्या लग्नाची तयारी गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. या लग्नाच्या प्रसंगी रविवारी तिच्या हळदी समारंभात दिक्षाने नातेवाईकांसोबत आणि बहिणींसोबत डान्ससुद्धा केला. परंतु, त्याच दिवशी रात्री 12:30 वाजता तिचा मृत्यू झाला. 

हे ही वाचा: महाराष्ट्रात 'या' 16 ठिकाणी होणार मॉक ड्रिल, सुरक्षेच्या दृष्टीनं तीन स्तरांमध्ये विभागणी, कशी असेल प्रक्रिया?

तरुणीचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. रात्री दिक्षा बाथरूमध्ये गेल्यानंतर ती बराच काळ बाहेर आली नाही आणि म्हणूनच घरातील सदस्यांनी तिला आवाज दिला, मात्र यावर बाथरूममधून दिक्षाची काहीच प्रतिक्रिया आली नाही. बाथरूममध्ये जात असताना ती खूप घाबरली होती आणि यामुळे तिला हार्ट अटॅक येऊन तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. 

हे ही वाचा: Ind vs Pak: महाराष्ट्रातही वाजणार युद्धाचा सायरन! मॉक ड्रिल नेमकं काय होणार? वाचा सविस्तर...

लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांसमोर अंत्यसंस्कार

अद्याप, कुटुंबाने दीक्षाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केलेले नाही. मुलीच्या लग्नासाठी घरी आलेले नातेवाईकच तिच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, याबाबतीत कुटुंबातील सदस्यांकडून कोणतीच तक्रार केली गेली नाही. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp