Operation Sindoor : 18 विमानतळ बंद..430 फ्लाईट रद्द, पाकिस्तान भारतावर करणार पलटवार?
India Vs Pakistan, Flights Cancelled : भारताच्या एअर स्ट्राईकने पाकिस्तानला हादरवून टाकलं आहे. पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारताने एअर स्ट्राईक करून पाकिस्तानमध्ये केला धमाका

भारतात 18 विमानतळे आणि 430 फ्लाईट्स रद्द..

भारत-पाकिस्तान युद्ध होणार का?
India Vs Pakistan, Flights Cancelled : भारताच्या एअर स्ट्राईकने पाकिस्तानला हादरवून टाकलं आहे. पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) च्या माध्यमातून मंगळवारी उशिरा रात्री भारताने पाकिस्तानमधील 9 दशतवादी अड्ड्यांना उद्ध्वस्त केलं. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफने प्रत्युत्तरात कोणतीही कारवाई न करण्याचं म्हटलं आहे. परंतु, पाकच्या पलटवारासाठी भारताने चौफेर तयारी केली आहे. देशातील 18 विमानतळे बंद करण्यात आली आहेत.
एअर स्ट्राईकनंतर 'हे' विमानतळ बंद
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. परंतु, पाकिस्तानकडून पलटवार झाल्यास भारतानेही पूर्ण तयारी केली आहे. अलर्टमुळे भारताने उत्तर आणि पश्चिम भारतातील 18 विमानतळ बंद केले आहेत. यामध्ये श्रीनगरच्या विमानतळाचाही समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या लिस्टमध्ये लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंडीगढ, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धरमशाला आणि जामनगर विमानतळाचा समावेश आहे.
हे ही वाचा >> 450 किमीची रेंज, बंकर्सही फोडतं... एअर स्ट्राईकमध्ये भारताने वापरलेलं 'स्काल्प आणि हॅमर' कसं काम करतं?
430 फ्लाईट्स रद्द
भारताच्या तिन्ही सेना दलांकडून पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर अनेक विमानतळं बंद करण्यात आली. फ्लाईटराडार-24 नुसार, आतापर्यंत जवळपास 430 फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. विमानतळ रद्द करण्यात इंडिगो एअरलाईन्स सर्वात पुढे आहे. या एअरलाईन्सचे जवळपास 160 फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत.
याप्रकरणी एअर इंडियाने सोशल मीडियावर सांगितलं की, जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भूज, जामनगर, चंडीगढ आणि राजकोट एअरपोर्ट्ससाठी विमाने 10 मे सकाळी 5.29 वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांचे तिकीट रद्द करण्यासाठी किंवा री-शेड्युलसाठी लागणारे शुल्क मोफत करण्यात आले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर एका पोस्टच्या माध्यमातून म्हटलंय की, या कालावधीत प्रवासासाठी व्हॅलिड तिकीट ठेवणाऱ्या पॅसेंजरला रि-शेड्युलिंग शुल्कवर सूट दिली जाईल.
हे ही वाचा >> "हे तर करायचंच होतं..देशासाठी हा क्षण...", ऑपरेशन सिंदूरनंतर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
प्रवाशांना अपडेट राहण्याचं आवाहन
इंडिगो एअरलाईन्सने त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की, प्रवाशांनी विमानतळावर जाण्याआधी आपल्या विमानाच्या डिटेल्सबाबत अपडेट नक्की घ्यावी. स्पाईसजेट एअरलाईन्सने म्हटलं की, धरमशाला, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर भारतातील काही भागात विमानतळे पुढील नोटिसपर्यंत बंद राहतील.