Gold Rate Today: अहो राव, काय आहे 'हा' सोन्याचा भाव! 15 प्रमुख शहरांतील आजचे दर वाचून धडकीच भरेल
Today Gold And Silver Price Rate : आज रविवारी 29 सप्टेंबरला देशातील प्रमुख शहरांत 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 77000 रुपयांच्या जवळपास आहे. मागील एक आठवड्यात सोन्याचे भाव 1470 रुपयांनी वाढला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोणत्या शहरांता सोन्याचे भाव गगनाला भिडले?
24 कॅरेट सोन्याचा भाव वाचून डोकंच धराल, कारण..
तुमच्या शहरात 24 आणि 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव काय? वाचा सविस्तर
Today Gold And Silver Price Rate : आज रविवारी 29 सप्टेंबरला देशातील प्रमुख शहरांत 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 77000 रुपयांच्या जवळपास आहे. मागील एक आठवड्यात सोन्याचे भाव 1470 रुपयांनी वाढला आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77550 रुपये आहे. आठवडाभरात चांदीची किंमतही 2000 रुपयांनी वाढली आहे. सध्या चांदीची एक किलोग्रॅमची किंमत 95000 रुपये इतकी आहे. देशातील 15 मोठ्या शहरात 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत किती रुपयांनी वाढली आहे, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. (Today, Sunday, 29th September, the price of 24 carat gold per 10 grams in major cities of the country is around Rs 77000. In the last one week, the price of gold has increased by Rs 1470)
दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राममध्ये सोन्याचा भाव
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 71,100 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत जवळपास 77,550 रुपये इतकी आहे.
लखनऊ
लखनऊमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमची किंमत 77,550 रुपये आहे. तर 22 कॅरेटच्या सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 71000 रुपयांवर पोहोचला आहे.
कोलकाता
कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 77400 रुपयांवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 70950 रुपयांवर पोहोचला आहे.










