अकोला : पोलीस निरीक्षक असलेला पती दुसऱ्या महिलेसोबत असल्याची खबर, पत्नी तिथे पोहोचताच तुफान राडा

मुंबई तक

amravati police inspector high voltage drama akola wife assault : अमरावतीच्या एका पोलीस निरीक्षकाने अकोल्यात भररस्त्यात पत्नीला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डाबकी रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस विभागाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ADVERTISEMENT

amravati police inspector high voltage drama akola wife assault
amravati police inspector high voltage drama akola wife assault
google news

बातम्या हायलाइट

point

अमरावती : पोलीस निरीक्षकाची भर रस्त्यात पत्नीला मारहाण

point

अधिकारी दुसऱ्या महिलेसोबत असल्याची खबर, अन्...

amravati police inspector high voltage drama akola wife assault, धनंजय साबळे : अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील राजापेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने अकोला शहरात मोठा गोंधळ घातल्याचं समोर आला आहे. अकोल्यातील डाबकी रोड परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस दलात आणि शहरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित पोलीस निरीक्षक एका कार्यक्रमासाठी अकोल्यात आले असताना, त्यांचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचा संशय त्यांच्या पत्नीला होता. आपला पती एका मंगल कार्यालयात दुसऱ्या महिलेसोबत असल्याची माहिती मिळताच पत्नीने आपल्या बहिणीसह तिथे धाव घेतली. यानंतर मंगल कार्यालयाच्या बाहेर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

मारहाण आणि विनयभंगाचे गंभीर आरोप; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यामध्ये पोलीस निरीक्षक काही लोकांच्या मदतीने एका महिलेला जबरदस्तीने रिक्षात बसवताना दिसत आहेत. तक्रारीनुसार, पोलीस निरीक्षकाने आपल्या पत्नीला सार्वजनिक ठिकाणी ओढत नेऊन मारहाण केली आहे. इतकेच नाही तर, तिथे उपस्थित असलेल्या अन्य एका व्यक्तीने महिलेचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या संपूर्ण वादादरम्यान मोठ्या प्रमाणावर शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचेही व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्याने अशा प्रकारे रस्त्यावर वर्तन केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलीसांच्या प्रतिमेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

डाबकी रोड पोलिसांत तक्रार दाखल; चौकशीनंतर कारवाईचे संकेत

पीडित पत्नीने याप्रकरणी अकोला येथील डाबकी रोड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. ठाणेदार दीपक कोली यांनी या माहितीला दुजोरा दिला असून, महिलेने पतीवर मारहाणीचे तर दुसऱ्या एका व्यक्तीवर विनयभंगाचे आरोप केल्याचे सांगितले आहे. सध्या या तक्रारीची चौकशी सुरू असून अद्याप कोणताही औपचारिक एफआईआर (FIR) दाखल करण्यात आलेला नाही. दुसरीकडे, संबंधित पोलीस निरीक्षकाने हा आपला कौटुंबिक वाद असल्याचे सांगत स्वतःदेखील सदर महिलेविरुद्ध तक्रार दिल्याचे म्हटले आहे. दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी दावे केल्यामुळे हे प्रकरण आता अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.

पोलीस निरीक्षकासारख्या वरिष्ठ पदावरील व्यक्तीने कायद्याचे रक्षक असतानाच अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप झाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाची दखल घेण्याची शक्यता आहे. ठाणेदार दीपक कोली यांनी स्पष्ट केले आहे की, तक्रारीची पडताळणी केल्यानंतरच पुढील कायदेशीर पावले उचलली जातील. सध्या अकोला आणि अमरावती या दोन्ही शहरांच्या पोलीस वर्तुळात या प्रकरणाचीच चर्चा रंगली असून तपास पूर्ण झाल्यावरच सत्य समोर येईल.

हे वाचलं का?