Amruta Fadnavis Video: "ओ मामी...", 'लाडकी बहीण' चा प्रचार करत मिसेस फडणवीसांची 'ती' रील तुफान व्हायरल!
Amruta Fadnavis Viral Reel : सध्या देशभरात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने"चा डंका जोरात वाजत आहे. महायुती सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या योजनेची तुफान चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
देशभरात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने"ची तुफान चर्चा
व्हिडीओत नेमकं काय?
Amruta Fadnavis Viral Reel : सध्या देशभरात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने"चा डंका जोरात वाजत आहे. महायुती सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या योजनेची तुफान चर्चा होत आहे. या योजनेचे दोन हफ्ते लाखो महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर, तिसरा हफ्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास आता सुरूवात झाली आहे. अशा परिस्थितीत आता भाजपचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आता स्वत: याच्या प्रचारासाठी ग्राउंडवर उतरल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा प्रचार करताना त्यांची एक रील सध्या तुफान व्हायरल होत आहे. (Amruta Fadnavis Viral instagram reel video on ladki bahin yojna know about it)
ADVERTISEMENT
व्हिडीओत नेमकं काय?
सोशल मीडियावर एक रील व्हिडीओ सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये अमृता फडणवीस दिसत आहेत. ऋतू रामटेके नावाच्या एका यूजरच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ही रील पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये ऋतू नावाचा मुलगा त्याची आई आणि अमृता फडणवीस यांच्यासोबत दिसत आहे. अमृता फडणवीस ऋतूच्या आईला विचारतात की, "भारती तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का?" यावर त्या हो म्हणतात. पुढे अमृता फडणवीस म्हणतात, "आता ऋतूचा गाल सुजत नसेल." तितक्यात ऋतू म्हणतो, "ओ मामी बरं झालं तुम्ही मामांना सांगितलं आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे आले, गल्लीतल्या सगळ्या बायकांचे पैसे आले.''
हेही वाचा : Govinda News: गोविंदासोबत गुलीगत धोका! घडलं भयानकच... वाचा A to Z Inside स्टोरी
या व्हिडीओच्या शेवटी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे गाणे देखील वाजताना ऐकू येत आहे. या रीलला अडीच हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले असून नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट्स देखील करत आहेत.
हे वाचलं का?
राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. महिल्यांच्या खात्यावर दोन हफ्त्यांचे पैसे जमा झाले असून काही महिलांना तिसऱ्या हफ्त्याची रक्कमही मिळाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT