Govinda News: गोविंदासोबत गुलीगत धोका! घडलं भयानकच... वाचा A to Z Inside स्टोरी

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बॉलिवूड अभिनेता गोविंदाला गोळी लागली

point

गोळी कशी आणि कधी सुटली?

point

पोलिसांनी रिव्हॉल्व्हर केली जप्त 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदाला गोळी लागली आहे. अभिनेता गोविंदाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. गोविंदाच्या गुडघ्याला गोळी लागल्याचा दावा त्याच्या मॅनेजरने केला आहे. पण तो आता धोक्याबाहेर आहे. आता गोविंदाला गोळी कशी लागली?, खरंच त्याला त्याच्याच परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने गोळी लागली आहे का?, गोळी लागली तेव्हा तो काय करत होता, कुठे निघाला होता? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. (bollywood actor govinda shoots himself by accidentally in leg with own revolver exactly what happened with him know in details)

आज 01 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी अभिनेता गोविंदा याला गोळी लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदाकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर आहे. याच परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून चुकून ही गोळी सुटली, ती मिसफायर झाली. ही गोळी थेट गोविंदाच्या पायाला लागली. रिव्हॉल्व्हरला लॉक नसल्याने हे घडलं असा दावाही केला जात आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

हेही वाचा : Rajinikanth Admitted to Hospital: सुपरस्टार रजनीकांत रूग्णालयात दाखल, एका रात्रीत असं काय घडलं?

गोळी कशी आणि कधी सुटली?

पहाटे ४.४५ च्या सुमारास गोविंदा त्याच्या जुहू येथील घरातून निघणार होता. तो कोलकात्याला विमानाने जाणार होता. पण त्यापूर्वी हा भयानक प्रकार घडला. यामध्ये गोविंदा जखमी झाला. मात्र, याप्रकरणी गोविंदाने अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. 60 वर्षीय गोविंदाला उपचारासाठी जवळच्या क्रिटिकेअर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. माहितीनुसार आता त्याची प्रकृती स्थिर आहे.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गोविंदाच्या मॅनेजरने माहिती देत सांगितले की, 'आम्हाला कोलकाता येथे एका शोसाठी सकाळी 6 वाजताची फ्लाइट पकडायची होती आणि मी विमानतळावर पोहोचलो होतो. गोविंदाजी त्यांच्या निवासस्थानातून विमानतळाकडे निघाले होते, तेव्हा ही दुर्घटना घडली.' मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, 'गोविंदा त्यांची परवाना असलेली रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवत असताना त्यांच्या हातातून रिव्हॉल्व्हर पडली आणि त्यातून गोळी सुटली. रिव्हॉल्व्हरचे लॉक उघडे असल्याने गोळी सुटली.'

हेही वाचा : Gold Rate: 'वाढीव तुमचा ह्यो कारभार...'; सोन्याने तर केलंय मार्केट जाम! पाहिलेत का आजचे 1 तोळ्याचे भाव?

पोलिसांनी रिव्हॉल्व्हर केली जप्त 

गोविंदाच्या घरी गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने तेथे पोहोचले. पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेत गोविंदाचे रिव्हॉल्व्हर आपल्या ताब्यात घेतले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गोविंदा आणि त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप या गोळीबाराच्या घटनेवर कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. गोविंदा केवळ अभिनेताच नाही तर शिवसेनेचा नेताही आहे. तो काही काळापासून चित्रपटांपासून दूर होता. त्याला बॉलिवूडचा हिरो नंबर वन आणि कुली नंबर वन असेही म्हटले जाते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT