परभणी : 36 वर्षीय इंजिनिअरला कार चालवताना ह्रदय विकाराचा झटका, गाडी रस्त्याच्या कडेला घेतली, पण व्हायचं तेच झालं
Parbhani News : संशय बळावल्याने पोलिसांनी वाहनाची माहिती तपासली. वाहन क्रमांकाच्या आधारे कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारची काच फोडून विक्रम यांना बाहेर काढले. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत होते. तात्काळ वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न झाला; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
परभणी : 36 वर्षीय इंजिनिअरला कार चालवताना ह्रदय विकाराचा झटका
गाडी रस्त्याच्या कडेला घेतली, पण व्हायचं तेच झालं
Parbhani News : पुण्यात नोकरीस असलेल्या परभणी जिल्ह्यातील एका तरुण अभियंत्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली. कार चालवत असताना प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांनी प्रसंगावधान दाखवत वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. मात्र काही वेळातच त्यांचा जीव गेला. या घटनेने रेणापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रेणापूर (ता. पाथरी) येथील रहिवासी विक्रम रोहिदास टेंगसे (वय 36) हे गेल्या सहा महिन्यांपासून पुण्यात खासगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होते. सोमवारी रोजच्या कामासाठी किंवा वैयक्तिक कारणासाठी ते कारमधून जात असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. परिस्थिती ओळखून त्यांनी तत्काळ गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. मात्र त्यानंतर बराच वेळ कार तिथेच उभी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
कार चालवताना ह्रदयविकाराचा झटका, जागेवर जीव गेला
संशय बळावल्याने पोलिसांनी वाहनाची माहिती तपासली. वाहन क्रमांकाच्या आधारे कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारची काच फोडून विक्रम यांना बाहेर काढले. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत होते. तात्काळ वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न झाला; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराचा तीव्र झटका हे मृत्यूचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
विक्रम टेंगसे हे शांत, अभ्यासू आणि मेहनती स्वभावाचे होते, अशी माहिती कुटुंबीय व परिचितांनी दिली. पुण्यात स्थिरावून कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र अल्पवयातच आलेल्या या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण, पत्नी आणि पाच वर्षांची चिमुकली मुलगी असा परिवार आहे. वडील रोहिदास टेंगसे हे रेणापूर येथील माजी केंद्रप्रमुख म्हणून ओळखले जातात. मुलाच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.










