Axiom 4 Mission चौथ्यांदा थांबवलं, एक गॅस लिक झाला आणि शुभांंशु शुक्लांची अंतराळ मोहीम लांबली
Axiom-4 मिशन चौथ्यांदा स्थगित झालं आहे. यापूर्वी खराब हवामान, जोरदार वारं आणि 45% पावसाची शक्यता यामुळे मिशन लांबणीवर पडले होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Ax-4 मिशनसाठी नियोजित केलेलं फाल्कन-9 लॉन्चिंग थांबवलं
गॅस लिक झाल्यामुळे मोहीम पुन्हा थांबवली
शुभांशु शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा लांबली
Axiom 4 Mission Postponed : भारतीय वायुसेनेचे पायलट आणि गगनयान मिशनसाठी निवडलेले पहिले भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची देशभरात चर्चा सुरूय. मात्र आता शुभांशू शुक्ला यांच्या ऐतिहासिक अंतराळ उड्डाणाला पुन्हा एकदा खीळ बसली आहे. 11 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) साठी रवाना होणाऱ्या Axiom-4 मिशनला लिक्विड ऑक्सीजन (LOx) गळतीमुळे स्थगित करण्यात आले आहे.
लॉन्चपूर्वी काय घडले?
SpaceX ने 'एक्स' वर माहिती देताना सांगितलं की, “Ax-4 मिशनसाठी नियोजित फाल्कन-9 लॉन्चिंग थांबवण्यात येतंय, जेणेकरुन LOx गळती दुरुस्त करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.” ही गळती बूस्टर स्टेजच्या पोस्ट-स्टॅटिक फायर चाचणीदरम्यान आढळली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने ही माहिती दिली की, फाल्कन-9 च्या सात सेकंदांच्या हॉट टेस्टदरम्यान प्रोपल्शन बेमध्ये लिक्विड ऑक्सीजनची गळती आढळली. ISRO, Axiom आणि SpaceX च्या तज्ज्ञांशी चर्चा करून गळती दुरुस्त करून आवश्यक व्हॅलिडेशन चाचण्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
हे ही वाचा >> माहेरहून गाय आण, स्कुटीसाठी पैसे आण म्हणत सासरच्यांनी छळलं, सुनेनं विहिरीत उडी मारून...
चौथ्यांदा टळले Axiom-4 मिशन
Axiom-4 मिशन चौथ्यांदा स्थगित झालं आहे. यापूर्वी खराब हवामान, जोरदार वारं आणि 45% पावसाची शक्यता यामुळे मिशन लांबणीवर पडले होते. यावेळी तांत्रिक बिघाडामुळे हा आंतरराष्ट्रीय मिशन ऐनवेळी थांबवण्यात आले.
Axiom-4 मिशन भारतासाठी का महत्त्वाचं?
Axiom Space, NASA, SpaceX आणि ISRO यांच्या संयुक्त भागीदारी असलेलं Axiom-4 मिशन भारतासाठी ऐतिहासिक आहे. 1984 मध्ये राकेश शर्मा यांच्यानंतर 41 वर्षांनी भारतीय नागरिक अंतराळात उड्डाण करणार आहे. शुभांशु शुक्ला ISS वर 14 दिवस विज्ञान, मायक्रोग्रॅव्हिटी, जीवन विज्ञान आणि मटेरियल सायन्सशी संबंधित प्रयोग करतील.









