तीन मुली झाल्यानंतर मुलाची अपेक्षा, पण चौथीही मुलगीच झाली; आईने तीन दिवसांच्या बाळाला गळा दाबून संपवलं

मुंबई तक

Belagaon Crime : तीन मुली झाल्यानंतर मुलाची अपेक्षा, पण चौथीही मुलगीच झाली; आईने तीन दिवसांच्या बाळाला गळा दाबून संपवलं

ADVERTISEMENT

Belagaon Crime
Belagaon Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तीन मुली झाल्यानंतर मुलाची अपेक्षा, पण चौथीही मुलगीच झाली

point

आईने तीन दिवसांच्या बाळाला गळा दाबून संपवलं

Belagaon Crime : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हिरेमुलंगी गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एका आईने तीन दिवसांच्या नवजात मुलीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला यापूर्वी तीन मुली असून यावेळी मुलगा जन्माला यावा, अशी तिची तीव्र इच्छा होती. मुलगी झाल्याचे लक्षात आल्यानंतर संतापाच्या भरात तिने हे क्रूर पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.

आधीपासून तीन मुली असल्यामुळे कुटुंबात मुलगा हवा, आईची अपेक्षा

अधिकची माहिती अशी की, रामदुर्ग तालुक्यातील हिरेमुलंगी गावातील अश्विनी हळकट्टी (वय 28) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तिला आधीपासून तीन मुली असल्यामुळे कुटुंबात मुलगा हवा, अशी अपेक्षा होती. 23 नोव्हेंबर रोजी मुदकवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिची प्रसूती पार पडली. प्रसूतीनंतरच्या दुसऱ्याच दिवशी ती आपल्या माहेरी, हिरेमुलंगी येथे परतली होती.

हेही वाचा : मुंबई: मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणं पडलं महागात! ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली अन्... तरुणासोबत घडलं भयानक

घटनेच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी घरातील इतर सर्व जण बाहेर गेले होते. त्या वेळी अश्विनीने एकटीच असताना आपल्या नवजात बालिकेचा गळा दाबून तिचा जीव घेतला. त्यानंतर तिने कुटुंबीयांना "बाळ श्वास घेत नाही" असे सांगून संशय दूर करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती तपासात आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp