मसाला डोसासोबत दिलं नाही सांभर, हॉटेलला तब्बल ‘एवढ्या’ रुपयांचा दंड!
बिहारमधील बक्सरमधून एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे सर्वच चकित झाले आहेत. डोसासोबत सांभर न दिल्याने ग्राहक न्यायालयाने चक्क हॉटेलवर दंड ठोठावला. तसेच 45 दिवसांत पैसे भरण्याचे आदेश दिले.
ADVERTISEMENT
Bihar News : बिहारमधील बक्सरमधून एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे सर्वच चकित झाले आहेत. डोसासोबत सांभर न दिल्याने ग्राहक न्यायालयाने चक्क हॉटेलवर दंड ठोठावला. तसेच 45 दिवसांत पैसे भरण्याचे आदेश दिले. मुदतीनुसर दंड न भरल्यास 8% व्याज मागितला आहे. (Bihar News the Hotel Not giving sambar with masala dosa Consumer Court fined with interest)
ADVERTISEMENT
अजित पवारांच्या बंडामुळे भाजपच्या स्नेहलता कोल्हेंची का झाली कोंडी?
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण 15 ऑगस्ट 2022 चे आहे. बक्सरच्या बंगला घाटात राहणारे वकील मनीष गुप्ता यांचा वाढदिवस होता. त्या दिवशी गणेश चतुर्थीही होती. यादिवशी त्याच्या आईचा उपवास होता. त्यामुळे त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी बाहेरून काहीतरी आणण्याचा विचार केला. ते नमक नावाच्या हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी खास मसाला डोसा ऑर्डर केला. तिथून डोसा घेऊन घरी आला. त्याने पाकीट उघडताच त्यात सांभर नसल्याचे त्याला दिसले. यामुळे आई-वडिलांसह घरात आलेले सर्व पाहुणे हसू लागले.
Crime : ‘या’ अॅपमुळे कुटुंबच संपलं! मुलांना दिलं विष अन् पत्नीसह घेतला गळफास
अखेर 11 महिन्यांनंतर न्यायालयाचा निर्णय!
मनीषने दुसऱ्या दिवशी हॉटेल मॅनेजरकडे याबाबत तक्रार केली. ज्यावर त्याने मनीषला उद्धटपणे उत्तर दिलं की, आता 140 रूपयांमध्ये तू काय संपूर्ण हॉटेल विकत घेणार का? यामुळे संतापलेल्या मनीषने हॉटेलला कायदेशीर नोटीस दिली. मात्र, हॉटेलकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर मनिषने जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार पत्र देऊन न्यायाची विनंती केली. अखेर 11 महिने चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने हॉटेलला दोषी ठरवले आणि ग्राहकाला शिक्षा म्हणून पैसे भरण्याचे आदेश दिले.
हे वाचलं का?
25 वर्षीय तरुणीचे अर्ध जळालेलं मांस खाल्लं, दोघांनी का केलं किळसवाणं कृत्य?
हॉटेलला ४५ दिवसांच्या मुदतीत पैसे भरण्याचे आदेश!
ग्राहक आयोगाचे अध्यक्ष वेदप्रकाश सिंह आणि सदस्य वरुण कुमार यांच्या खंडपीठाने या प्रकरणी निर्णय दिला. ग्राहकांना झालेल्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाबद्दल आयोगाने रेस्टॉरंटला 2,000 रुपये दंड आणि खटल्याच्या खर्चासाठी 1,500 रुपये वेगळा दंड ठोठावला. अशाप्रकारे सर्व खर्च मिळून एकूण 3500 रुपयांचा दंड 45 दिवसांत भरण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सांगितले की, जर पैसे वेळेवर दिले नाहीत तर 8% व्याज देखील वेगळे भरावे लागेल. न्यायालयाच्या निर्णयानंतर ही बाब सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT