Exclusive: Chandrayaan-3 Vikram लँडरने नुकतेच पाठवले चंद्राचे नवे फोटो!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

chandrayaan 3 exclusive photos of the moon sent by the lander contact was established between vikram lander and isro control room
chandrayaan 3 exclusive photos of the moon sent by the lander contact was established between vikram lander and isro control room
social share
google news

Chandrayaan 3 Moon Exclusive Photo: बंगळुरु: भारताचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा चांद्रयान-3 (chandrayaan 3) हा प्रोजेक्ट अखेर आज (23 ऑगस्ट) पूर्ण झाला आहे. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरचं यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग झालं. दरम्यान, जेव्हा विक्रम लँडर हे चंद्रावर उतरत होतं त्यावेळी त्यावरील कॅमेऱ्याने चंद्राच्या त्या पृष्ठभागाचे काही फोटो घेतले होते. ज्याचे फोटो आता समोर आले आहेत. पाहा हे एक्स्क्लुझिव्ह फोटो. (chandrayaan 3 exclusive photos of the moon sent by the lander contact was established between vikram lander and isro control room)

ADVERTISEMENT

चांद्रयान-3 प्रोजेक्टमधील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा हा सॉफ्ट लँडिंगचा होता. जो यशस्वीपणे पार पडल्याने भारताचं हे प्रोजेक्ट 100 टक्के यशस्वी ठरलं आहे. आता या विक्रम लँडरमधून प्रज्ञान हे रोव्हर बाहेर येणार असून ते चंद्राच्या पृष्ठभागावरीव पुढील निरिक्षणांची नोंद करणार आहे.

मात्र, त्याआधी चंद्राच्या पृष्ठभागाचे पहिलेवहिले फोटो हे आता समोर आले आहेत. याबाबत इस्त्रोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे फोटो पोस्ट केले आहेत.

हे वाचलं का?

ज्यामध्ये इस्त्रोने म्हटलं आहे की, ‘चांद्रयान-3 लँडर आणि MOX-ISTRAC, बंगळुरू यांच्यात संपर्क प्रस्थापित झाला आहे. लँडर खाली उतरताना असताना त्यावरील कॅमेऱ्याने घेतलेले हे फोटो आहेत.’

ADVERTISEMENT

विक्रम लँडरने चंद्राचे पाठवलेले फोटो

 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Chandrayaan-3 Landing VIDEO: भारताचं चंद्रावर पहिलं पाऊल, पुन्हा-पुन्हा पाहावा असा ऐतिहासिक क्षण!

असं झालं विक्रमचं लँडिंग:

विक्रम लँडरने 25 किमी उंचीवरून चंद्रावर उतरण्याचा प्रवास सुरू केला. पुढील टप्प्यावर पोहोचण्यासाठी सुमारे 11.5 मिनिटे लागली.
7.4 किलोमीटर उंचीपर्यंत त्याचा वेग 358 मीटर प्रति सेकंद होता. पुढील प्रवास 6.8 किलोमीटरचा होता.
6.8 किमी उंचीवर, वेग 336 मीटर प्रति सेकंद कमी झाला होता. पुढील स्तर 800 मीटर होता.
800 मीटर उंचीवर लँडरचे सेन्सर्स चंद्राच्या पृष्ठभागावर लेझर किरण टाकून लँडिंगसाठी योग्य जागा शोधली.
150 मीटर उंचीवर लँडरचा वेग 60 मीटर प्रति सेकंद होता. म्हणजे 800 ते 150 मीटर उंचीच्या दरम्यान होतं.
60 मीटर उंचीवर लँडरचा वेग 40 मीटर प्रति सेकंद होता. म्हणजे 150 ते 60 मीटर उंचीच्या दरम्यान होता.
10 मीटर उंचीवर लँडरचा वेग 10 मीटर प्रति सेकंद होता.
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना म्हणजेच सॉफ्ट लँडिंगसाठी लँडरचा वेग 1.68 मीटर प्रति सेकंद होता.
ISRO च्या शास्त्रज्ञांनी ज्या पद्धतीने हे मिशन आखलं होतं त्यानुसार विक्रम लँडरचं लँडिंग झालं.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.
आतापर्यंत फक्त चार वेळा चंद्रावर यान उतरविण्यात आलं आहे. ज्यामध्ये आता भारताचाही नंबर लागला आहे.

विक्रम लँडरने चंद्राचे पाठवलेले फोटो

 

विक्रम लँडरवरील चार पेलोड काय काम करतील?

1. रंभा (RAMBHA): हे चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्यापासून येणार्‍या प्लाझ्मा कणांची घनता, प्रमाण आणि बदल तपासेल.

2. चास्टे (ChaSTE): हे चंद्राच्या पृष्ठभागाची उष्णता म्हणजेच तापमान तपासेल.

3. इल्सा (ILSA): हे लँडिंग साइटच्या आसपासच्या भूकंपीय हालचालींबाबत तपासणी करेल.

4. लेझर रेट्रोरिफ्लेक्टर एरे )Laser Retroreflector Array (LRA): तो चंद्राची गतिशीलता समजून घेण्याचा प्रयत्न करेल.

हे ही वाचा >> Chandrayaan 3 : ज्यांच्या मार्गदर्शनामुळे भारताने इतिहास रचला ते एस सोमनाथ कोण आहेत?

प्रज्ञान रोव्हरवर दोन पेलोड आहेत, ते काय करणार?

1. लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS): हे चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या रसायनांचे प्रमाण आणि गुणवत्तेचा अभ्यास करेल. तसेच खनिजांचाही शोध घेईल.

2. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (Alpha Particle X-Ray Spectrometer – APXS): ते घटकांच्या रचनेचा अभ्यास करेल. उदाहरणार्थ, मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, कथील आणि लोह. ते लँडिंग साइटभोवती चंद्राच्या पृष्ठभागावर शोधले जातील.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT