kasba peth, Chinchwad: चिंचवड-कसब्यात मतदारांची पाठ, आता प्रतिक्षा निकालाची

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चिंचवडमध्ये 50 टक्के मतदारांनी मतदानच केलं नाही

चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीबद्दल मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. चिंचवड विधानसभा मतदारसंघात 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. त्यापैकी फक्त 2 लाख 87 हजार 145 मतदरांनीच मतदानाचा अधिकार बजावाला.

चिंचवडमध्ये 3 लाख 2 हजार 974 पुरुष मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 57 हजार 820 मतदारांनी मतदान केलं. 2 लाख 65 हजार 974 महिला मतदार आहेत, त्यापैकी 1 लाख 29 हजार 321 महिला मतदारांनीच मतदानाचा अधिकार बजावला.

52.1 टक्के पुरुष मतदारांनी, तर 48.62 महिला मतदारांनी मतदान केलं. त्यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत 50.47 टक्के मतदान झालं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कसबा पेठ मतदारसंघात सव्वा लाख मतदान

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं. कसबा पेठ मतदारसंघात 2 लाख 75 हजार 679 मतदार आहेत. त्यापैकी 74 हजार 218 पुरुष आमि 63 हजार 800 महिला मतदारांनी मतदानात सहभाग घेतला.

54.18 टक्के पुरूष मतदार आणि 46 टक्के महिला मतदारांनी मतदान केलं. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत 50.6 टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे कोण जिंकणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

ADVERTISEMENT

मतदान संपल्यानंतर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी समर्थकांसह पदयात्रा काढली. पिंपळे सौदागरमधील भैरवनाथ मंदिरापर्यंत ही यात्रा काढण्यात आली. यावेळी शेकडो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले. या यात्रेत लक्ष्मण भाऊ अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.

ADVERTISEMENT

चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. दोन्ही मतदारसंघात आज (26 फेब्रुवारी) मतदान झालं. निवडणुकीबद्दल नेते आणि पक्षांमध्ये मोठी चुरस दिसून आली असली, तरी मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. चिंचवड विधानसभा आणि कसबा पेठ विधानसभा या दोन्ही मतदारसंघात खूपच कमी मतदान झालं. त्यामुळे मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचंच आकडेवारीतून समोर आलं आहे. कसबा पेठ मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 45.25 टक्केच मतदान झालं, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात 41.1 टक्के मतदान झालं आहे. दोन्ही मतदारसंघात 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाल्यानं विजय कुणाचा होणार, याची उत्सुकता वाढली आहे.

Kasba Peth, Chinchwad by polls Live : चिंचवडमध्ये बोगस मतदान

चिंचवड मतदारसंघामध्ये बोगस मतदान करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एका मतदार महिलेच्या नावे दुसरंच कुणीतरी मतदान करून गेल्याचं दुपारी समोर आलं. चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथील प्रेरणा स्कुल येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे.

चिंचवड-कसब्यात मतदारांमध्ये निरुत्साह! दुपारपर्यंत जेमतेम मतदान

चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघात मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचंच चित्र आहे. राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या पोटनिवडणुकीबद्दल मतदारांमध्ये मात्र निरुत्साह दिसून येत आहेत. चिंचवडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत फक्त 30.55 टक्के, तर कसबा पेठ मतदारसंघात 30.05 टक्केच मतदान झालं. निवडणूक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

दोन्ही मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 9 वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 3.52 टक्के, तर कसब्यात 6.5 टक्केच मतदान झालं.

सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदानाचा टक्का थोडा वाढला. अकरा वाजेपर्यंत चिंचवडमध्ये 10.45 टक्के, तर कसबा पेठमध्ये 8.25 टक्केच मतदान झालं.

सकाळी 7 ते दुपारी एक वाजेपर्यंत चिंचवड मतदारसंघात 20.68 टक्के मतदान झालं. कसबा पेठ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी दुपारी एकपर्यंत 18.5 टक्के होती.

कलाटे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते भिडले, काय घडलं?

चिंचवड मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे, तर राहुल कलाटे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. मतदानाच्या दिवशी सकाळी राहुल कलाटे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते यांच्या हाणामारी झाल्याचं बघायला मिळालं. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दुपारी एक वाजेपर्यंत चिंचवड मतदारसंघात 20.68 टक्के मतदान, तर कसबा पेठ मतदारसंघात 18.5 टक्के मतदान.

चिंचवडमध्ये 10.45 टक्के, कसब्यात 8.25 टक्के

चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीत मतदारांमध्ये उत्साह नसल्याचं दिसत आहे. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या चार तासांत दोन्ही मतदारसंघात 11 टक्केही मतदान झालेलं नाही. चिंचवड मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 10.45 मतदान झालं आहे. तर कसबा पेठ पोटनिवडणुकीत 8.25 टक्के मतदान झालं.

चिंचवडमध्ये चार तासांत जवळपास 11 टक्के मतदान

चिंचवड विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 10.54 टक्के मतदान झालं आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली. 11 वाजेपर्यंत 10.54 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं.

रुपाली ठोंबरेंनी शेअर केला ‘ईव्हीएम’चा फोटो

Kasba Peth by election 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरेंनी पुन्हा एक वाद ओढवून घेतला आहे. कसबा पेठ मतदारसंघात मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी गेलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मतदान करतानाचा ईव्हीएमचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.

रुपाली ठोंबरे पाटील यांनी कसबा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला, पण मतदान करताना त्यांनी चक्क ईव्हीएम मशीनसोबतचं फोटो काढला. ईव्हीएमवरील कोणतं बटन दाबलं, हे त्यांच्या फोटोत स्पष्ट दिसत आहे. त्या इतक्यावरच थांबल्या नाही, तर त्यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.

लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 130 नुसार मतदान हे गोपनीय असतं. मतदाराला त्याने कुणाला मतदान केलं, याबद्दल गुप्तता बाळगावी लागते. जर मतदाराकडून गोपनीयतेचा भंग झाला, तर त्याच्यावर लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 130 नुसार कारवाई होते.

Kasba Peth Bypoll : ‘ईव्हीएम’सोबत फोटो! रुपाली ठोंबरेंवर कारवाई होणार

कसबा पेठ मतदारसंघात मतदान सुरू असून, सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. 9 वाजेपर्यंत कसबा पेठ मतदारसंघात 6.5 टक्के मतदान झालं.

चिंचवडमध्ये दोन तासांत 3.52 टक्के मतदान

चिंचवड विधानसभा मतदार सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत चिंचवड मतदारसंघात 3.52 टक्के मतदान झालं आहे. या मतदार संघामध्ये एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार असून, 510 मतदार केंद्रावर मतदान होत आहे.

Kasba Peth By Poll : हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर; कोणाची किती संपत्ती?

चिंचवड पोटनिवडणूक : अश्विनी जगतापांनी केलं मतदान

चिंचवड मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा अधिकार बजावला.

कसबा पोटनिवडणूक: पैसे वाटल्याचा Video व्हायरल, मतदानाच्या आदल्या दिवशी मोठा ड्रामा

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त

पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून एकमेकांविरुद्ध आरोप झाले आहेत. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. शहर पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल असे सुमारे 1700 पोलीस, तसेच शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत.

kasba Peth: हेमंत रासने की रवींद्र धंगेकर, पाच फॅक्टर ठरवणार कोण जिंकणार?

चिंचवड-कसबा पेठ पोटनिवडणूक : मतदानाला सुरूवात

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून, सकाळी मतदानाला सुरूवात झाली. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.

Chinchwad-kasba Peth bypolls Live Updates : सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या चिंचवड (Chinchwad) आणि कसबा पेठ (kasba Peth) पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपच्या अश्विनी जगताप (ashwini jagtap) मैदानात आहेत, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रसेचे नाना काटे (Nana Kate) निवडणूक रिंगणात आहेत. चिंचवडमधून राहुल कलाटे (Rahul Kalate) हे अपक्ष असून, तिरंगी लढत बघायला मिळत आहे. कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा मतदारसंघात भाजपने हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे निवडणूक लढवत आहे. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न दिल्यानं आणि ब्राह्मण व्यक्तीला डावलल्याचा दावा करत ब्राह्मण महासंघाचे आनंद दवेही (anand Dave) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक होत असून, कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. (Chinchwad-Kasba Peth bypolls 2023)

    follow whatsapp

    ADVERTISEMENT