Chinchwad Bypolls: राहुल कलाटेंच्या उमेदवारीबद्दल शरद पवारांनी सोडलं मौन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Chinchwad Bypolls 2023। Sharad Pawar। Rahul kalate। nana kate : चिंचवडमध्ये तिरंगी लढत होत असल्याचं चित्र आहे. भाजपने अश्विनी जगताप यांनी उमेदवारी दिलीये, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीकडून तिकीट मिळू शकतं अशी चर्चा असणाऱ्या राहुल कलाटेंनी ऐनवेळी अपक्ष म्हणून अर्ज भरला. कलाटेंच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत होईल, अशी चर्चा आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी हे फेटाळून लावलं आहे.

ADVERTISEMENT

पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारसभा घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. “विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात आघाडीमध्ये विचारविनिमय झाला. चिंचवडची जागा राष्ट्रवादीने लढवावी असा निर्णय झाला. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उद्धव ठाकरेंचे चिरंजीव हे संयुक्त कार्यक्रम घेणार आहेत.”

“अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य सहकाऱ्यांना हवं तसं यश मिळालं नव्हतं. एक काळ असा होता की, महापालिका असो की अन्य संस्था… जनतेचा पाठिंबा आम्हाला असायचा. मधल्या दोन निवडणुकीत वेगळं चित्र दिसलं”, असं पवार म्हणाले.

हे वाचलं का?

Rahul Kalate यांना मिळणारी मतं कोणाचा करणार गेम? की होणार स्वतः आमदार?

पुढे शरद पवार म्हणाले, “या निवडणुकीत नाना काटे उभे आहेत. महाविकास आघाडी ही निवडणूक लढवत आहेत. सहज चक्कर टाकावी म्हणून मी आज इथे आलो.”

ADVERTISEMENT

राहुल कलाटेंच्या अपक्ष उमेदवारींबद्दल शरद पवार काय बोलले?

चिंचवडमध्ये तिरंगी लढत होईल अशी चर्चा आहे असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, “माझा गेल्या 50-60 वर्षांतील निवडणुकांचा असा अनुभव आहे की, अशी ऐनवेळी उमेदवार दाखल केल्यानंतर त्यांची चर्चा होते, पण मतांच्या परिवर्तनामध्ये ते हळू हळू खाली जातात.”

ADVERTISEMENT

“अर्ज भरल्याच्या दिवशी आणि त्यानंतर अपक्षाची चर्चेची हाईट होती, ती खाली मला दिसतेय. नुसतीच खाली नाही, तर ते नाव सुद्धा उमेदवारांमध्ये आहे की नाही अशा स्थितीत जाऊन पोहोचलं आहे”, असं पवारांनी सांगितलं.

Rahul Kalate : ठाकरेंनी सांगूनही कलाटेंची माघार नाहीच, स्वतःच सांगितलं कारण

“ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार आहे. बाकी अन्य वेगळं चित्र इथे दिसेल, असं मला वाटतं नाही. शहराच्या विकासात आमच्या पक्षाच्या लोकांचा हात मोठा होता. पण, आम्ही ही गोष्ट नाकारू शकत नाही की, मागच्या वेळी लोकांनी आम्हाला बाजूला केलं. लोकशाहीमध्ये जे लोक सत्तेवर बसवतात, ते लोक सत्तेपासून बाजूलाही करतात”, असं मत पवारांनी मांडलं.

प्रकाश आंबेडकर घेणार सभा, पवार म्हणाले…

प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत आणि अपक्ष उमेदवाराच्या सभेला येतात, काय समजायचं? असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, “प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांना आपला विचार आणि आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी तो निर्णय घेतला, त्यात आम्ही भाष्य करण्याचं कारण नाही.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT