क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यातून बेपत्ता, शोधाशोध सुरु

मुंबई तक

ADVERTISEMENT

Indian cricketer Kedar Jadhav's father mahadev jadhav has gone missing from Pune
Indian cricketer Kedar Jadhav's father mahadev jadhav has gone missing from Pune
social share
google news

Kedar Jadhav Father news :

ADVERTISEMENT

पुणे : भारताचा मराठमोळा क्रिकेटपटू केदार जाधव (Kedar Jadhav) याचे वडील पुण्यातून बेपत्ता झाल्याची बातमी येत आहे. महादेव (दादा) जाधव (85) असं त्यांचं नाव आहे. आज (सोमवारी) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कोथरुड भागातून ते बेपत्ता झाल्याची माहिती आहे. याबाबत जाधव कुटुंबियांकडून अलंकार पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. केदार जाधवने आपल्या इन्टाग्रामवर याबाबत स्टोरी ठेवली असून यात त्याने वडिलांबाबत माहिती दिली आहे. (Indian cricketer Kedar Jadhav’s father mahadev jadhav has gone missing from Pune)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जाधव कुटुंबीय कोथरूड भागात राहतात. महादेव जाधव यांना स्मृतीभंशाचा आजार आहे. अशात सोमवारी सकाळी ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सोसायटीतून सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून मुख्य गेट मधून बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ, सुरक्षा रक्षक रिक्षा घेऊन गेला, मात्र महादेव जाधव यांचा काहीच शोध लागलेला नाही.

हे वाचलं का?

हेही वाचा : IPL 2023: ‘येत्या आयपीएमध्ये…’, ऋषभ पंतबद्दल सौरभ गांगुलीचं महत्त्वाचं भाष्य

सुरुवातीला जाधव कुटुंबियांनी शोधाशोध घेतली पण महादेव जाधव यांचा काहीच शोध लागलेला नाही. त्यांच्याजवळ असलेला मोबाईलही बंद लागत आहे. त्यांचा काहीच संपर्क होऊ न शकल्यानं कुटुंबियांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड भागातील अनेक CCTV फूटेज तपासणी केली आहे, यात कोथरूडकडून कर्वेनगर परिसरात जातांना, महादेव जाधव दिसत आहेत, मात्र त्याच्या पुढे ते कुठे निघून गेले याचा शोध सुरू आहे.

हेही वाचा : पाकिस्तान हरला आणि शोएब अख्तर भलताच खुश झाला; काय आहे कारण?

केदार जाधवची कौटुंबिक पार्श्वभूमी :

केदार जाधव याचा जन्म 26 मार्च 1985 रोजी पुण्यात झाला. त्याच्या वडिलांचे नाव महादेव जाधव आणि तर आईचे नाव मंदाकिनी जाधव असे आहे. जाधव कुटुंबियांचे मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील जाधववाडी आहे. केदार जाधव यांचे वडील 1980 मध्ये पुण्यात स्थलांतरित झाले होते. ते महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात लिपिक होते, त्यानंतर 2003 मध्ये ते सेवानिवृत्त झाले आहेत. वयोमानानुसार त्यांना स्मतीभंशाचा आजार जडला असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा : BCCI Contract List: अंजिक्य रहाणेसह 6 खेळाडूंचे करिअर करारामुळे धोक्यात

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT