Gold Rate: सोन्याच्या भावाला डिमांड आली... ओ शेठ आजच्या किंमती पाहून धक्काच बसेल थेट!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देशात सोन्याचा भाव 72,000 रुपयांहून अधिक आहे

point

7 सप्टेंबरपासून गणेश चतुर्थीच्या सणानिमित्ताने सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. देशात सोन्याचा भाव 72,000 रुपयांहून अधिक आहे. शनिवार 7 सप्टेंबरपासून गणेश चतुर्थीच्या सणानिमित्ताने सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा (11 सप्टेंबर 2024) भाव… (gold-silver prices ganeshotsav on 11 september 2024 in maharashtra know the details)

ADVERTISEMENT

Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी (10 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 72, 870 रूपये होता. आज यामध्ये 410 रूपयांनी वाढ झाली असून 73,250 रूपये किंमत झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या भावात 380 रूपयांनी वाढ झाली आहे. ही किंमत आता 67,150 रूपयांवर पोहोचली आहे आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 86,500 रूपये झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

हेही वाचा : Govt Job: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीत 'या' महत्त्वाच्या पदांवर नोकरीची संधी! झटपट करा अर्ज 

आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. आता लग्नासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते सणासुदीच्या काळात सोन्याचा दर 76,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो.

हे वाचलं का?

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,150 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,250 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,940 रूपये आहे.

पुणे

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,150 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,250 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,940 रूपये आहे.

नागपूर

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,150 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,250 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,940 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,180 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,280 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,970 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

हेही वाचा : Maharashtra Weather: ढगाळ वातावरण, मुसळधार सरी; महाराष्ट्राला आज हायअलर्ट! 

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT