Govt Jobs : युको बँकेत नोकरीची संधी, 60 हजारांहून अधिक पगार; लगेच करा अर्ज

मुंबई तक

युको बँकेत विशेष अधिकारी पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना 90 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Govt Jobs
Govt Jobs
Google CTA

बातम्या हायलाइट

point

युको बँकेत नोकरीची संधी

point

60 हजारांहून अधिक पगार

point

लगेच करा अर्ज

Govt Jobs : युको बँकेने विशेष अधिकारी (Specialist Officers) पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे मॅनेजर-एआय/एमएल इंजिनिअर आणि मॅनेजर-सायबर सिक्युरिटी या दोन्ही पदांच्या एकूण 20 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी uco.bank.in वर केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

अर्ज कसा करावा?

अर्ज करण्याची प्रक्रिया 29 ऑगस्टपासून सुरू झाली असून 18 सप्टेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. 1 ऑगस्ट 2026 रोजी अर्जदारांचे वय 25 ते 35 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 175 रुपये आहे, तर इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 850 रुपये शुल्क आकारले जाईल. उमेदवारांची निवड ऑनलाईन लेखी परीक्षा, स्क्रीनिंग, गट चर्चा किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना बँकेच्या आवश्यकतेनुसार देशभरात कुठेही नियुक्ती दिली जाऊ शकते.

हे ही वाचा : भाजप नेत्याच्या सुनेनं संपवलं जीवन, पतीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी दोन्ही पदांनुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव निश्चित करण्यात आला आहे. मॅनेजर-एआय/एमएल इंजिनिअर पदासाठी कॉम्प्युटर सायन्स, आयटी, एआय/एमएल किंवा डेटा सायन्स या विषयात किमान 50% गुणांसह बी.ई./बी.टेक, एम.सी.ए. किंवा एम.टेक पदवी आवश्यक आहे; सोबतच एआय किंवा डेटा सायन्स आधारित प्रकल्पांमध्ये काम करण्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तर मॅनेजर-सायबर सिक्युरिटी पदासाठी संबंधित अभियांत्रिकी शाखांमध्ये किमान 50% गुणांसह पदवी आणि OSCP, OSWE, GIAC यांसारखी मान्यताप्राप्त सायबर सुरक्षा प्रमाणपत्रे अनिवार्य आहेत, तसेच रेड टीम ऑपरेशन्स आणि पेनिट्रेशन टेस्टिंगमध्ये किमान 3 वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव असणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : खारघर : भाजपच्या कार्यकर्त्याकडे एसआयआरचे फॉर्म, नागरिकाने पकडलं, पुढे...

90 हजार रुपयांहून अधिक पगार

निवड झालेल्या उमेदवारांना मध्य व्यवस्थापन श्रेणी (MMGS-II) अंतर्गत आकर्षित वेतनश्रेणी मिळणार आहे. या पदासाठी मूळ वेतनश्रेणी 64,820 ते 93,960 अशी निश्चित करण्यात आली आहे. मूळ वेतनाशिवाय नियमानुसार मिळणारे इतर भत्ते आणि सेवा-सुविधा बँकेकडून लागू असणार आहेत. योग्य आणि इच्छुक उमेदवारांना अंतिम तारखेपूर्वी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.