Gulabrao Patil : ‘जुलाबराव’वरून भडकले गुलाबराव पाटील; त्या कथित क्लिपमध्ये काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

gulabrao patil audio clip viral : police filed fir against 3 people.
gulabrao patil audio clip viral : police filed fir against 3 people.
social share
google news

-मनीष जोग, जळगाव

Gulabrao patil audio clip viral : मराठा आरक्षण हा विषय राज्यात संवेदनशील मुद्दा बनला आहे. या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचे प्रयत्न होताहेत. यातच एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही क्लिप गुलाबराव पाटील आणि एका कार्यकर्त्यांमधील असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या क्लिपची सत्यता समोर आलेली नाही. या क्लिपमध्ये कार्यकर्ता आणि गुलाबराव पाटील यांच्या चांगलीच जुंपली आहे. (Gulabrao patil Audio clip goes viral)

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये ते कार्यकर्त्याला शिवीगाळ करताना दिसत आहेत. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जुलाबराव अन् शिवीगाळ… त्या क्लिपमध्ये काय?

एका कार्यकर्त्यासोबतची पाटील यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद घालताना कार्यकर्त्याने गुलाबरावांना जुलाबराव म्हटलं. त्यामुळे गुलाबराव चांगलेच भडकले. त्यांनी थेट कार्यकर्त्याला आईवरून शिवीगाळ केली. सध्या जळगाव जिल्ह्यात गुलाबरावांची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून त्याची चर्चा आहे.

हेही वाचा >> Udayanraje bhosale : ‘देवेंद्रजी काळजी करू नका… तुम्ही देवेंद्रराजे भोसले आहात’

का झाला वाद?

क्लिपमध्ये अर्वाच्य भाषा वापरली गेली आहे. गुलाबराव पाटील यांनी या कार्यकर्त्याला अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्याला आईवरूनही शिवीगाळ केली. गुलाबरावांनी शिवीगाळ केल्यावर कार्यकर्त्याकडूनही गुलाबराव पाटलांना अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचं या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. संबंधित कार्यकर्ता आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील संभाषणाची ही कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

ADVERTISEMENT

तिघांविरोधात गुन्हा दाखल

व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये दोघांचेही फोटो दिसत आहेत. फोटो असलेल्या कार्यकर्त्याचे नाव रमेश पाटील आहे. ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्या औरंगाबाद येथील व्यक्तीसह ती ऑडिओ क्लिप व्हायरल करणारे धरणगाव येथील दोन जण अशा तिघांविरुद्ध मंगळवारी (5 सप्टेंबर) धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> India Rename Bharat: देशाला असं मिळालं India नाव, बदलण्यासाठी कायदेशीर आणि घटनात्मक प्रक्रिया काय?

जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, या प्रकरणानंतर संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्या कार्यकर्त्यासोबत फोनवरून संपर्क साधण्यात आला. त्यावर त्याने ती क्लिप माझीच असल्याचं स्पष्ट केलं. मात्र आता मला गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्या विरोधात औरंगाबाद येथील पोलीस ठाण्यात तक्रार देणार असण्याची माहिती त्यांनी दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT