Viral News: ऐकावं ते नवलच! नवऱ्याने दातांनी कापले बायकोचे ओठ, बेडरुममध्ये असं घडलं तरी काय?

मुंबई तक

Husband-Wife Crime News: पती-पत्नीमध्ये नेहमीच छोटेमोठे वादविवाद होत असतात. पण असंही म्हणतात की, भांड्याला भांडं लागलं की नवरा-बायकोमध्ये प्रेमही वाढतं. परंतु, काही भांडणं इतकी वाढतात की, त्यावर नियंत्रण मिळवणं कठीण बनतं.

ADVERTISEMENT

Husband-Wife Crime News
Husband-Wife Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पती-पत्नीत वादविवाद झाल्याने घडला धक्कादायक प्रकार...

point

पतीने दातांनी कापले पत्नीचे ओठ

point

पत्नीच्या ओठांना मारले 18 टाके

Husband-Wife Crime News: पती-पत्नीमध्ये नेहमीच छोटेमोठे वादविवाद होत असतात. पण असंही म्हणतात की, भांड्याला भांडं लागलं की नवरा-बायकोमध्ये प्रेमही वाढतं. परंतु, काही भांडणं इतकी वाढतात की, त्यावर नियंत्रण मिळवणं कठीण बनतं. उत्तर प्रदेशच्या मथुरामधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका पतीने आपल्या पत्नीसोबत वादविवाद झाल्यानंतर असं काही केलं की, जे वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण या पतीने आपल्या दातांनी त्याच्या पत्नीचे ओठच कापले. पतीने पत्नीच्या ओठांना इतक्या वाईट पद्धतीने कापलं की, तिच्या ओठांवर 18 टाके पडले आहेत. या गंभीर प्रकरणाची सर्वत्र चर्चा रंगली असून पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

पतीने दातांनी कापले पत्नीचे ओठ

हे संपूर्ण प्रकरण मथुराच्या मगोर्रा परिसरातून समोर आलं आहे. इथे एका व्यक्तीने रागाच्या भरात पत्नीचे ओठ दातांनी कापले. यामुळे त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्या ओठांना 16 टाके पडले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, मोगरा परिसरातील नगला भूचन येथे राहणाऱ्या पीडितेसोबत पतीने क्रुरपणे वागणूक दिली.

हे ही वाचा >> Video: 'कॉमन मॅन'साठी DCM एकनाथ शिंदेंनी अचानक ताफा थांबवला! मुंबईच्या रस्त्यावर घडलं तरी काय?

घरात काम करणाऱ्या पत्नीशी वादविवाद घालून पतीने तिच्या ओठांनी कापलं. याचदरम्यान पतीने पत्नीला मारहाणही केली. पीडितेच्या ओठांतून रक्त वाहू लागल्याने तिला बोलताही येत नव्हतं. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. पीडित महिलेनं तिच्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार केलीय. दरम्यान, पीडित महिला रुग्णालयात उपचार घेत आहे. पती-पत्नीच्या वादविवादाच्या गंभीर घटनेची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलीय. ही घटना गंभीर आणि आगळीवेगळी असल्याचं म्हटलं जात आहे. 

हे ही वाचा >> बाईई.. काय हा प्रकार, पुण्यात नोकरीसाठी 3000 इंजिनीअर रांगेत Video झाला व्हायरल

हे वाचलं का?

    follow whatsapp