Trending : हनिमूनला झाली 20 वर्ष… पण तेव्हापासून जगभर कपड्यांशिवाय फिरतं ‘हे’ जोडपं

मुंबई तक

ADVERTISEMENT

British couple Fiona and her husband Michael Discom love to travel nude around the world
British couple Fiona and her husband Michael Discom love to travel nude around the world
social share
google news

काही लोकांना फिरायला जाण्याची आवड असते, काहींना बाईकवरुन फिरायला जायला आवडत, काहींना ट्रेनने फिरायला आवडत. काहींना पर्यटन स्थळ फिरायला आवडतात, काहींना धार्मिक स्थळी भेट देणं आवडतं. थोडक्यात काय फिरायला आवडण्यापासून कुठे आणि कसं फिरायला जायचं यात बऱ्याच आवडीनिवडी आहेत. यात अनेकदा काही वेगळ्या आवडीनिवडीही दिसून येतात. अशीच एक वेगळी आवड असणार जोडप सध्या चर्चेत आहे. (British couple Fiona and her husband Michael Discom love to travel nude around the world)

ADVERTISEMENT

ब्रिटनचे फिओना आणि तिचा पती मायकल डिस्कॉम हे जोडप सध्या चर्चेत आहे. चर्चेत असण्याचं कारण म्हणजे या जोडप्याची आवड. या जोडप्याला न्यूड अर्थात कपडे काढून फिरायला जाणं आवडतं. आतापर्यंत या जोडप्याने जिथे कपडे काढून फिरु शकतो अशा जगातील शेकडो स्थळांना भेटी दिल्या आहेत. त्यासाठी जवळपास $19,000 (सुमारे 15 लाख रुपये) खर्च केले आहेत. हे जोडप आता भेट देण्यासाठी अशी ठिकाणे शोधत आहेत, जिथे ते रात्र होण्यापूर्वीच कपडे काढू शकतील आणि फिरु शकतील.

उंदराच्या हत्येनंतर आता सापाच्या खुनाचा खटला, Video झाला व्हायरल

त्याचं झालं असं की, लग्नानंतर हे जोडपं हनिमूनला ग्रीसला गेलं आणि तिथं पहिल्यांदा न्यूड झालं. तेव्हापासून दोघांनाही न्यूड प्रवासाची आवड आहे. दोघांचही वय आता 50 च्या आसपास आहे. दोघेही हनिमूनला ग्रीसला गेले होते. तिथं त्यांनी सुंदर ठिकाणांचा आनंद लुटला आणि कपड्यांशिवाय शेकडो फोटो क्लिक केले. त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंट देखील आहे, इथे ते त्यांचे फोटो शेअर करत असतात. न्यूड ट्रॅव्हलशी संबंधित त्यांची एक वेबसाइटही आहे.

हे वाचलं का?

हनिमूनला काय घडलं?

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, त्यांच्या हनीमूनची आठवण सांगताना फियोना म्हणाली, ‘मला आठवतं की ग्रीसच्या त्या छोट्या तलावात एका आमच्याशिवाय कोणीही नव्हतं आणि तेव्हा मला समजलं की आपण न्यूड आहेत. आम्हाला दोघांनीह त्यावेळी आश्चर्याचा धक्का बसला होता. तेव्हा मला पहिल्यांदा कसं वाटले माहित नाही पण ते जे काही होतं ते खूप सुंदर होतं. त्यानंतर आम्हाला दोघांनाही कपड्यांमध्ये अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे समुद्राजवळ जाण्यापूर्वी देखील दोघांनीही कपडे काढले. तेव्हा आम्हाला ‘स्वातंत्र्य’ वाटल्याचंही ते सांगतात.

मुलगी 5 वर्षाची झाली तरी संशय, दोघांनी टेस्ट करताच धक्काच बसला

जोडपे नैसर्गिक ठिकाणी जातात :

फियोना म्हणाली, ‘माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला खूप मोकळं वाटलं. मी माझ्या शरीराचा आकार स्वीकारू शकले आणि लोक माझ्याबद्दल काय विचार करतील याची काळजी करणं सोडून दिलं. उघड्या त्वचेवरील घटक मला जाणवत होते यामुळे मला न्यूड राहण्याची प्रेरणा मिळाली. आम्ही शक्य तितक्या नैसर्गिक ठिकाणांना भेट देण्याच्या प्रयत्नात आहोत.यामध्ये थायलंड आणि ग्रीनलँडचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

शरीराबद्दल तणाव असायचा :

या जोडप्याचे म्हणणं आहे की, तरुणपणी त्यांना त्यांच्या शरीराची खूप काळजी असायची. फियोना तिचे वजन लपवण्यासाठी मोठ्या साईजचे कपडे घालायची. पण आता कपड्यांशिवाय राहिल्याने ते आपल्या शरीरावर प्रेम करू लागले आहेत. मात्र, अजूनही त्यांना लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागत. फियोना म्हणाली, ‘जेव्हा तापमान वाढतं, तेव्हा आम्ही घरातही कपड्यांशिवाय वावरतो, आम्हाला खूप छान वाटतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT