1 तारखेपासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल, नेमका काय होणार परिणाम
नव्या वर्षाची उद्यापासून सुरुवात होत आहे, मात्र फक्त नवं वर्षच बदलतं असं नाही तर सरकारकडून आता 1 तारखेपासून काही नवे नियमही लावले आहेत. त्यामुळे एलपीजी गॅसपासून ते अगदी आयकर करापर्यंत अनेक नवे बदल करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
Rule Change From 1st January: नवीन वर्षाच्या म्हणजेच 2024 ची उद्यापासून सुरुवात होत आहे. त्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सगळं जग सज्ज झालं आहे. मात्र आता फक्त वर्षचं बदलतं आहे असं नाही, तर देशात काही नवे बदलही होणार आहेत. त्यामुळे देशात होणाऱ्या या बदलाचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर आणि खिशावरही होणार आहे. यामध्ये तुमच्या बँक लॉकरपासून (Bank Locker) ते अगदी तुमच्या किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या (LPG Gas) किंमतीपर्यंत हे बदल होणार आहेत. यूपीआय पेमेंट (UPI Payment) पासून सिमकार्डपर्यंतही (SIM Card) बदल होणार आहेत.
ADVERTISEMENT
1.LPG गॅसबाबत मोठा निर्णय
महिन्याच्या 1 तारखेला ज्या प्रमाणे देशातील अनेकांच्या नजरा एलपीजी गॅसच्या किंमतीवर खिळलेल्या असताता, त्याच प्रमाणे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसावर भारतातील अनेक नागरिकांच्या नजरा एलपीजी गॅसच्या किंमतीवर टिकून आहेत. स्वयंपाकघरातील एलपीजी गॅसच्या किंमतीतील चढउताराचा परिणाम जनसामान्यांच्या खिशावर पडत असतो. काही दिवसपूर्वी सरकारने 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये दिलासा दिला होता. मात्र, स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतहा दीर्घकाळ बदल झाला नाही. मात्र नव्या वर्षाच्या निमित्ताने एलपीजी गॅसच्या किंमतीत दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता सध्या देशातील मोठ मोठ्या शहरांमध्ये 14 किलोच्या सिलिंडरच्या किंमती पाहिल्या तर विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ही दिल्लीमध्ये 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईमध्ये 902.50 तर चेन्नईमध्ये त्याची किंमत 918.50 रुपये आहे. त्यामुळे नव्या वर्षामध्ये एलपीजी गॅसच्या किंमती दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2. बँक लॉकर करार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही (RBI) काही नवे नियम केले आहेत. बँकेकडून करण्यात येणाऱ्या लॉकर करारामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या करारांतर्गत खातेधारांना निर्णय घेण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. मात्र ही मुदत आता 1 जानेवारी रोजीच संपत आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सर्व बँकांना त्यांच्या ग्राहकांच्या लॉकर करारामध्ये (Bank Locker Agreement) सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरबीआयने सांगितल्या प्रमाणे तो करार झाला नाही तर तुम्हाला बँक लॉकर रिकामे करावे लागणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बँक लॉकर घेतले असेल तर नवीन लॉकर करार आजच पूर्ण करून घेण्याची गरज आहे.
हे वाचलं का?
3. UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी…
UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. त्यामुळे 1 जानेवारी ही तारीख त्यांच्यासाठी खास असणार आहे. कारण नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून पेटीएम, गुगल पे, फोन पे या सारख्या ऑनलाईन पेमेंट अॅप्सचे यूपीआय आयडी ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे गेल्या एक वर्षापासून किंवा अधिक काळ ऑनलाईन पेमेंट अॅप्सचा वापर करण्यात आला नाही. किंवा जे वापरले गेले नाहीत, ते बंद केले जाणार आहेत. त्यामुळे आपल्याकडे यूपीआय आयडी असेल तर त्यावरून तुम्ही आता तात्काळ व्यवहार करण्याची गरज आहे.
4. नवीन सिम कार्डबद्दल नवा नियम
देशात नव्या वर्षाबरोबरच बँक, एलपीजी गॅस आणि इतर गोष्टीमध्ये बदल करण्यात येत आहे. या बदलाबरोबरच 1 जानेवारीपासून टेलिकॉम सेक्टरबाबतही मोठे बदल होत आहेत. दूरसंचार विभागाकडून 1 जानेवारीपासून आता सिम कार्डसाठी कागदावर आधारित असलेली केवायसी प्रक्रिया रद्द केली जाणार आहे. त्यामुळे आता नवीन सिमकार्ड घेण्यासाठी कोणत्याही ग्राहकाला कागदी फॉर्म भरण्याची गरज असणार नाही. त्याऐवजी आता फक्त डिजिटल केवायसी म्हणजेच ई-केवायसी अनिवार्य करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Thane Rave Party : एलएसडी, चरस घेऊन रेव्ह पार्टी; 12 तरुणी, 90 तरुणांना…
5. आयटीआर फायलिंग
भारतात नव्या वर्षाच्या निमित्ताने नवे नियम लागू केले जात असतानाच इन्कम टॅक्स म्हणजे आयकर कर भरण्याच्या बाबतीतही काही नवे नियम करण्यात आले आहेत. आता इन्कम टॅक्स भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2023 होती, मात्र ज्यांच्याकडून ही टॅक्स भरला गेला नाही. त्यांना ही संधी आता 31 डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत इन्कम टॅक्स अगदी विलंब शुल्कासह दाखल केला जाऊ शकतो असंही सांगण्यात आले आहे. इन्कम टॅक्सवर जो दंड लावण्यात आला आहे, तो आता ज्या त्या उत्पन्नावर असणार आहे. ज्यांचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना दंड 5 हजार रुपयांपर्यंत असणार आहे. तर 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर त्यांच्यासाठी दंडाची ही रक्कम 1 हजार रुपये असणार आहे.
ADVERTISEMENT
या बदलांचा मोठा परिणाम
या मोठ्या बदलाबरोबरच 1 जानेवारीपासून दुसरेही काही बदल होणार आहेत. त्याचाही थेट परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे. त्या नव्या नियमामध्ये आता विमा कंपन्यांचाही समावेश आहे. हा नियम केल्यामुळे विमा नियामकने विमा कंपन्यांना ग्राहकांना नवी माहिती देण्यासाठी ती स्वतंत्रपणे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कारच्या किंमती वाढणार
त्याचबरोबर 1 जानेवारी पासून वाहन खरेदी करणंही परवडणारं नसणार आहे. कारण कारच्या किंमतीमध्ये वाढ होणार असल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. टोयोटा, मारुती, महिंद्रा, किया, ह्युंदाई, होंडा आणि टाटाच्या कारच्या किंमतीमध्ये 2 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय त्यांच्या कंपन्यांनी घेतला आहे.
बँक 16 दिवस बंद
या बदलाबरोबरच या महिन्यात बँकांना सुट्ट्याही मिळणार आहेत. या महिन्यात बँका 16 दिवस बंद राहणार आहेत, त्यामुळे बँक ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis : “भावी खासदार पोस्टर लावणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम”, फडणवीसांचा इशारा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT