Rohit Deo: ‘स्वाभिमानाच्या विरोधात काम..’, कोर्ट सुरू असताना राजीनामा; न्या. देव आहेत तरी कोण?
स्वाभिमानाच्या विरोधात काम करु शकत नाही. असं म्हणत कोर्ट सुरू असताना राजीनामा देणार न्यायमूर्ती रोहित देव आहेत तरी कोण?
ADVERTISEMENT

नागपूर: ‘इथं हजर असलेल्या प्रत्येकाची मी माफी मागतो. मी कधी तुमच्यावर रागावलो असेल तर ते तुमच्या आणि न्यायव्यवस्थेच्या भल्यासाठीच. ही व्यवस्था आणखी प्रगत आणि उन्नत व्हावी हाच माझा हेतू… मला कुणालाही दुखवायचे नाही. कारण तुम्ही सर्व माझ्या कुटुंबासारखे आहात. तरीही माझ्यामुळे कोणी दुखावलं असेल तर मी माफी मागतो. पण, मी आज माझ्या न्यायमूर्तीपदाचा राजीनामा देतोय. कारण स्वाभिमानाच्या विरोधात जाऊन मी काम करू शकत नाही.’ हे शब्द आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव (Justice Rohit Deo) यांचे… (know in detail about justice rohit deo who resigned while the court was in session)
अचानक खुल्या कोर्टात त्यांनी राजीनामा दिल्यानं चर्चेचा विषय ठरला… पण, खुल्या कोर्टात असा राजीनामा देणारे न्यायमूर्ती रोहित देव कोण आहेत? त्यांनी असा खुल्या कोर्टात तडकाफडकी राजीनामा का दिला? त्यांनी आतापर्यंत दिलेले महत्वाचे निर्णय कोणते? हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
कोर्टात सकाळी कामकाजाला सुरुवात झाली. सर्व वकील आणि पक्षकार बसलेले असताना न्यायमूर्ती रोहित देव आले आणि काही क्षणातच राजीनाम्याची घोषणा केली. स्वाभिमानाच्या विरोधात जाऊन काम करू शकत नाही, असं ते बोलू लागले आणि कोर्टात हजर असलेले सर्वच अवाक् होतात. हे सगळं घडलं ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात.
हे ही वाचा >> पुण्याच्या पठ्ठयाची कमाल! इंजिनियरिंग केलं नसतानाही गुगलने दिली ‘इतक्या’ लाखाची नोकरी
खुल्या कोर्टात न्यायमूर्तींनी राजीनामा देण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी… पण, न्यायमूर्तींना निवृत्तीआधीच असा तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला? असा प्रश्न आता विचारला जातोय.