Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत किती अर्ज...सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यातून?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana aditi tatkare give informatiion of total number of applicant district wise date mukhyamantri majhi ladki bahin yojana scheme ajit pawar eknath shinde
1 कोटी 41 लाख महिलांची योजनेसाठी नाव नोंदणी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

1 कोटी 41 लाख महिलांची योजनेसाठी नाव नोंदणी

point

1 कोटी 30 लाख अर्ज मंजूर झाले

point

या जिल्ह्यातून महिलांचा योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Scheme :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात येत्या 19 ऑगस्ट दरम्यान 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत अर्ज केलेल्या महिला अर्जदारांचा (Women Applicant) आकडा समोर आला आहे. त्यानुसार आतापर्यंत 1 कोटी 41 लाख 98 हजार 898 महिलांनी योजनेसाठी नाव नोंदणी केली आहे.त्यातले 1 कोटी 30  लाख अर्ज मंजूर झाले आहेत. यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यातून (District Data) किती अर्ज मंजूर झाले आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana aditi tatkare give informatiion of total number of applicant district wise date mukhyamantri majhi ladki bahin yojana scheme ajit pawar eknath shinde) 

ADVERTISEMENT

राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी अर्ज केलेल्या महिलांचा आतापर्यंतचा आकडा सांगितला आहे. महायुती सरकारच्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" या महत्वाकांशी योजनेला महाराष्ट्रातील माता-भगिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत 1 कोटी 41 लाख 98 हजार 898 महिलांनी योजनेसाठी नाव नोंदणी केली आहे.प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी सुरु असुन आतापर्यंत 1 कोटी 30 लाख 29 हजार 980 अर्ज पात्र झाले आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : खात्यात एक रुपया पोहोचलाच नाही, 'त्या' 16 लाख महिला अर्जदारांचं काय होणार?

आदिती तटकरे यांनी यावेळी जिल्हावार आकडेवारी देखील दिली आहे. यामध्ये पुण्यातून महिलांचे सर्वाधिक अर्ज आले आहे. पुण्यातून 9 लाख 73 हजार 63 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानंतर नाशिकमधून 7  लाख 37 हजार 708 अर्ज प्राप्त झाले आहेत. अहिल्यानगरमधून 7 लाख 8 हजार 948 अर्ज केले गेले आहेत. तर सर्वात कमी अर्ज हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्राप्त झाले आहेत. सिंधुदुर्गातील 1 लाख 478 महिलांनी अर्ज केले आहेत. 

हे वाचलं का?

जिल्हानिहाय अर्जाचा आकडा? 

मुंबई उपनगर : 385886
मुंबई शहर : 173191
पालघर : 296051 
ठाणे : 548110
रायगड : 349485
रत्नागिरी : 174324
सिंधुदुर्ग : 150478
कोल्हापूर : 696073 
सांगली: 459836
सातारा : 520828
सोलापूर : 614962 
पुणे : 973063 
नाशिक : 737708 
अहिल्यानगर : 708948 
बीड : 352668
लातूर : 340239 
धाराशीव : 179639 
नांदेड  : 473087 
परभणी : 25762 
जालना : 300548 
छत्रपती संभाजीनगर : 541554 
हिंगोली : 179145
नंदूरबार : 261956 
धुळे : 272894 
जळगाव : 533958
बुलढाणा : 387091 
वाशिम : 188504
अकोला : 261895 
अमरावती : 400177
यवतमाळ : 467674
वर्धा : 202349
चंद्रपूर : 284967
नागपूर : 579404
भंडारा : 209484
गोंदीया : 288920 
गडचिरोली : 156335

हे ही वाचा : CM Eknath Shinde: 'टोलवाटोलवी करू नका', मुख्यमंत्री शिंदे एवढे कोणावर संतापले?

महिलांनी स्वत:साठी काही खरेदी करा

''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी उशीर होत आहे. पण महिलांना त्यांचा हक्क मिळेल. त्यासाठी कितीही रक्कम मोजावी लागली तरी चालेल.आमचा प्रयत्न आहे की,  17 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करावेत. आतापर्यंत सव्वा कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. 17 तारखेपर्यंत हा आकडा दीड ते दोन कोटींवर जाईल. कालच मी 6000 कोटी रूपयांच्या  फाईलवर सही करून आलो आहे. ते पैसै तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. या पैशातून तुमच्या स्वत:साठी काहीतरी घ्या'', असे आवाहन अजित पवारांनी महिलांना केले आहे. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT