Maharashtra Breaking News Live: खासदार शाहू महाराजांना पोलिसांना अडवलं, विशाळगडावर नो एंट्री
Maharashtra News: महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये विशाळगडाच्या मुद्यावरून सध्या राजकारण तापलं आहे. याशिवाय इतरही अनेक अपडेट आपल्याला या लाइव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
ADVERTISEMENT
Maharashtra Breaking news Updates: महाराष्ट्रात सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडाच्या मुद्यावरुन बरंच राजकारण तापलं आहे. त्यातच आज (16 जुलै) काँग्रेस खासदार छत्रपती शाहू महाराज यांना विशाळगडावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
ADVERTISEMENT
दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार या आज अचानक बारामतीतील मोदी बागेत गेल्या. जिथे शरद पवार यांचं निवासस्थान आहे. पण पवारांच्या निवासस्थानी त्या नेमक्या का गेल्या, त्यांची शरद पवारांशी भेट झाली का? याबाबत अद्याप तरी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, याशिवाय इतरही दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यासंदर्भातील अपडेट्स आपल्याला इथे पाहता येतील...
तर सध्या महाराष्ट्रात पावसाची नेमकी स्थिती काय आहे. पाऊस नेमका कुठे बरसतोय आणि नेमका कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे याचीही माहिती तुम्हाला या लाइव्ह ब्लॉगमध्ये मिळेल. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर मुंबईसह काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देखील जारी केला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील हवामानाचे नेमके अपडेट्सबद्दल लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहा.
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
- 01:50 PM • 16 Jul 2024
Ajit Pawar on Nilesh Lanke: पालकमंत्री विखे-पाटलांनी निलेश लंकेंना मोठा त्रास दिला म्हणून.., अजित पवारांचं मोठं विधान
अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार निलेश लंके हे महायुतीकडून लढण्यासाठी तयार होते मात्र महायुती मध्ये ती जागा भाजपाकडे रनिंग असल्यामुळे आम्हाला देता आली नाही पण दक्षिण नगर आणि माढा या लोकसभा जागांच्या संदर्भात आम्ही महायुती मधे विचारणा केली होती तेव्हा दक्षिण नगर मधून नीलेश लंके आणि माढा मधून धैर्यशील मोहिते पाटील हे लढणार होते पण भाजपने या जागा आम्हाला महायुतीत सोडल्या नाहीत याचबरोबर निलेश लंके यांनी पारनेर विधानसभेसाठी पत्नीच्या उमेदवारीसाठी सुद्धा आग्रह धरला होता पालकमंत्री विखे पाटील यांनी आमदार निलेश लंके यांना खूप त्रास दिला आहे. त्यामुळेच ते महाविकास आघाडीकडे गेले याचबरोबर निलेश लंके यांच्या मित्रांच्या खडी क्रॅशर कंपन्यांना मोठ्या प्रमाणात टॅक्स लावल्यामुळे आणि त्रास दिल्यामुळे निलेश लंके यांनी हा वेगळा निर्णय घेतला
- 01:44 PM • 16 Jul 2024
Shankaracharya Swami Avimukteshwaranand: शंकराचार्य अवीमुक्तेश्वरानंद यांचं 'ते' विधान, पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले..
'मी याच्यावरती राजकीय भाषा करणार नाही शंकराचार्य यांनी देखील राजकीय भाष्य केलेले नाही.. शंकराचार्य यांनी फक्त त्यांचे मन मोकळं केलं. कारण, शिवसेना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आहे. ज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत होते, करत आहेत. पण त्या शिवसेनेचा विश्वासघाताने कसा तुकडा पडला, त्याला हिंदुत्व मानता येणार नाही. हा हिंदूंचा विश्वासघात आहे. अशा प्रकारच्या भावना शंकराचार्यांनी व्यक्त केल्या. शंकराचार्य यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो आणि मातोश्रीवर येऊन शंकराचार्य यांनी आशीर्वाद माननीय उद्धव ठाकरे साहेब यांना दिलेला आहे.' असं म्हणत संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे भाजपला टार्गेट केलं आहे.
- 01:37 PM • 16 Jul 2024
Maharashtra LIVE Update: डोंबिवलीहून पंढरपूरला निघालेल्या बसला अपघात, 5 जणांचा मृत्यू
डोंबिवली: डोंबिवलीहून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेल्या बसच्या पनवेल मध्ये पुणे द्रुतगती महामार्गावर खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू झाला, तर 42 जण जखमी झाले असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.
डोंबिवली मधील निळजे, ऊषरघर असे 2 ते 3 गावामधून 4 बस पंढरपूरकडे निघाल्या होत्या. पनवेलपासून 5 किलोमीटर पुढे पुणे द्रुतगती महामार्गावर एका बसच्या पुढे ट्रॅक्टर जात होता. अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि बस 20 फूट खाली पडली. या बस मधील 3 भाविक जागीच ठार झाले तर ट्रॅक्टर मधले 2 प्रवाशी मृत झाले. तसेच बस मधील 7 प्रवाशी गंभीर जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे तर 42 भाविक किरकोळ जखमी झाले आहेत.
◆ अपघातामधील 3 मृतकांचे नावे
1) गुरुनाथ बापू पाटील
2) रामदास नारायण मुकादम
3) हंसाबाई पाटील - 01:34 PM • 16 Jul 2024
Vishalgad live News Update: खासदार शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं
विशाळगडावर जो काही हिंसाचार झाला होता त्यानंतर आज कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज आणि काँग्रेस नेते सतेज पाटील हे पाहणी करण्यासाठी कोल्हापूरहून विशाळगडाच्या दिशेने निघाले होते. पण त्यांना पांढरपाणी या ठिकाणीच पोलिसांनी अडवलं असून त्यांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
विशाळगड परिसरात जमावबंदी लागू असल्याने तिथे जाता येणार नाही अशी माहिती पोलिसांनी यावेळी शाहू महाराजांना दिली आहे.
ADVERTISEMENT