Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल बघताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दहावीचा निकाल बघण्यासाठी वेबसाईट

point

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

point

दहावीचा निकाल बघण्यासाठी टिप्स

Maharashtra ELection 2024 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात MSBSHSE नं घेतलेल्या दहावी परीक्षेचा (Maharashtra SSC Result 2024) निकाल आज, 27 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला जाणार आहे. (maharashtra ssc board result 2024 official website and easy method for result)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. निकालाची ठळक माहिती दिली जाईल. 

दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांची निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, निकाल कसा पाहाल याविषयी सोप्या टिप्स लक्षात ठेवा.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

SSC Result websites : दहावीचा निकाल 'या' वेबसाईटवर पहा

1) https://mahresult.nic.in

2) http://sscresult.mkcl.org  

ADVERTISEMENT

3) https://sscresult.mahahsscboard.in

ADVERTISEMENT

4) https://results.digilocker.gov.in

5) https://results.targetpublications.org

हेही वाचा >> 10वीचा निकाल मोबाइल आणि वेबसाइटवर कसा पाहायचा?

दहावीचा निकाल कसा पाहायचा? 

1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या. 

2) होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. 

3) तुमच्या लॉगिन डिटेल्स भरा म्हणजे रोल नंबर, आईचं नाव आणि क्लिक करा.

4) स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेपर्यंत थांबा. 

5) निकाल उपलब्ध झाल्यानंतर तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा त्याची प्रिंट घ्या. 

दहावीचा निकाल आधी ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला जातो. विद्यार्थ्यांना बोर्डाची मार्कशीट ही काही दिवसांनतर त्यांच्या शाळेमधून मिळते.

हेही वाचा >> पोर्श कार अपघात प्रकरणाला धक्कादायक वळण! 'ससून'मधील मोठ्या डॉक्टरला अटक

SMS द्वारे कसा बघायचा MHSSC निकाल?

-मोबाईल घ्या आणि टेक्स मेसेज सुरू करा

-मेसेजमध्ये MHSSC असे टाईप करा त्यानंतर स्पेस द्या आणि तुमचा सीट नंबर टाका.

-त्यानंतर हा मेसेज 57766 हा क्रमांक टाकून सेंड करा

-हा मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईलवर दहावीचा निकाल येईल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT