कोकण आणि मराठवाड्यात पाऊस घालणार धुमाकूळ! महाराष्ट्रासह मुंबईत कसं आहे आजचं हवामान?

मुंबई तक

Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत सोसाट्याचा वारा वाहत असतानाच पावसाच्या सरीही कोसळत आहेत.

ADVERTISEMENT

मान्सूनचा पाऊस
मान्सूनचा पाऊस
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या जिल्ह्यात वाहणार वादळी वारे?

point

या जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या हलक्या सरी

point

आजच्या हवामानाबाबत वाचा सविस्तर माहिती

Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत सोसाट्याचा वारा वाहत असतानाच पावसाच्या सरीही कोसळत आहेत. काही भागात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाटही होत आहे. अशात नैऋत्य मान्सून आता अरबी समुद्र, मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात आला आहे.

त्यामुळे नाशिक, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाट परिसरात ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात शक्ती चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज शनिवारी राज्यात कसं हवामान असणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा >>  Mumbai Tak Chavdi : 'योग्य वेळी चांगली बातमी येईल...', शिवसेना UBT- मनसे युतीवर संजय राऊतांचं मोठं विधान!

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज..अंशतः ढगाळ आकाश आणि शहर आणि उपनगरात दुपार/संध्याकाळच्या सुमारास तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) वाहण्याची शक्यता आहे.  कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34°C आणि 26°C असणार आहे.

हे ही वाचा >> महिला पोलीस कैद्याच्या प्रेमात झाली वेडीपिसी, गरोदर होण्यासाठी जेलमध्येच केला मोठा जुगाड!

हे वाचलं का?

    follow whatsapp