Shakti Cyclone: नवं संकट! 'शक्ती' चक्रीवादळ येतंय, महाराष्ट्राच्या 'या' भागांना धोका!
शक्ती चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात तयार होत आहे. पण त्याचा नेमका परिणाम महाराष्ट्रावर कसा होणार हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बंगालच्या उपसागरात तयार होतंय शक्ती चक्रीवादळ
शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम करणार?
शक्ती चक्रीवादळ नेमकं कधी धडकणार?
मुंबई: नैऋत्य मान्सून आता अरबी समुद्र, मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात पुढे सरकला आहे. ज्यामुळे नाशिक, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर येथील घाट भागात ढग दिसून आले. तर दुसरीकडे दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ प्रदेशात विखुरलेले मेघगर्जनेसह पाऊस बरसत आहे.
एकंदरीतच मागील काही दिवसांपासून पावसानं महाराष्ट्रात धडक मारली आहे. आणि आता महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांसाठी एक धोक्याची घंटा वाजत आहे. ज्यामुळे 'शक्ती' चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा>> इथे नवऱ्या मुलाची व्हर्जिनिटी तपासते नवरीची 'काकी', आधी काकीसोबत संबंध अन् नंतर मुलीसोबत लग्न!
माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक नवीन वादळ तयार होतं आहे. त्याचं नाव 'शक्ती' असं सांगितलं जात आहे. याचा महाराष्ट्रात परिणाम होणार आहे का? हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
'शक्ती' चक्रीवादळाचा कोणकोणत्या राज्यावर परिणाम होणार?
मान्सून आता अरबी समुद्र, मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात पोहोचला आहे. अशातच 23 ते 28 मे दरम्यान ते चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. याचा परिणाम अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह भारतातील विविध राज्यांवर होऊ शकतो.










