Govt Job: थेट NIA मध्ये नोकरीची संधी, पगार ऐकून थक्कच व्हाल!
NIA ने इंस्पेक्टर, सब-इंस्पेकटर आणि असिस्टंट सब-इंस्पेक्टरच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र अधिकाऱ्यांनी येत्या 45 दिवसांच्या आत अर्ज करणं अनिवार्य आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

NIA मध्ये नोकरीची संधी

NIA मध्ये कोणत्या पदांसाठी निघाली भरती?

NIA तर्फे मोठ्या पदांसाठी बंपर भरती
NIA recruitment 2025: भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच National Investigation Agency (NIA) ने देशभरातील पात्र अधिकाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी प्राप्त करुन दिली आहे. NIA ने इंस्पेक्टर, सब-इंस्पेकटर आणि असिस्टंट सब-इंस्पेक्टरच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र अधिकाऱ्यांनी येत्या 45 दिवसांच्या आत अर्ज करणं अनिवार्य आहे.
कोणत्या पदांसाठी भरती आणि वेतन
या भरतीच्या सूचनेनुसार, इंस्पेक्टर म्हणजेच निरीक्षकांसाठी एकूण 65, उपनिरीक्षकांसाठी 24 आणि सहाय्यक उपनिरीक्षकांच्या 9 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
इंस्पेक्टर पदासाठी वेतन: पे मॅट्रिक्स लेव्हल-7 (PB-2, ग्रेड पे 4600 रुपये)
सब-इंस्पेक्टर पदासाठी वेतन: पे मॅट्रिक्स लेव्हल-6 (PB-2, ग्रेड पे 4200 रुपये)
असिस्टंट सब-इंस्पेक्टर पदासाठी वेतन: पे मॅट्रिक्स लेव्हल-5 (PB-2, ग्रेड पे 2800 रुपये)
राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील NIA शाखांसाठी पदांसाठीच्या रिक्त जागा भरण्यात येतील.
पात्रता
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि सेवा कालावधी यासंबंधी सर्व माहिती Annexure-I(परिशिष्ट-I) (A), I(B), I(C) मध्ये दिली आहे. ही सर्व माहिती NIA च्या www.nia.gov.in/recruitment-notice.htm या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. अर्ज केल्यानंतर उमेदवार आपले नाव मागे घेऊ शकत नाहीत हे लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करावा.
हे ही वाचा: अत्यंत सुंदर दिसणाऱ्या तरुणीचा Live सुरू असतानाच खेळ खल्लास, थेट डोक्यातच...
कसा कराल अर्ज?
इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज योग्यरित्या खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत:
SP (Admin), NIA HQ, Opposite CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110003
यासोबतच, उमेदवार त्यांच्या इच्छेनुसार, याची कॉपी अॅडवान्स्ड रुपात (spadmin.nia@gov.in) या पत्त्यावर इमेल किंवा पोस्टच्या स्वरुपात पाठवू शकतात.
आवश्यक दस्तऐवज आणि संपूर्ण माहिती
अर्ज करताना, उमेदवारांना काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. सर्वात आधी, बायोडेटा (Annexure-II) नुसार भरावा लागेल आणि अधिकाऱ्यांकडून त्याची पडताळणी करावी लागेल. यासोबतच, 2019-20 ते 2023-24 या वर्षातील एपीएआर (APAR) च्या प्रती प्रत्येक पानावर योग्य रबर स्टॅम्प आणि स्वाक्षरीसह सादर कराव्या लागतील.
याव्यतिरिक्त, उमेदवाराला त्याच्या विभागाकडून विजिलेंस क्लियरंस प्रमाणपत्र आणि इंटीग्रिटी म्हणजेच सचोटी प्रमाणपत्र मिळवावे लागेल आणि ते अर्जासोबत जोडावे लागेल. गेल्या 10 वर्षात जर तुमच्यावर कोणताही मोठा किंवा किरकोळ दंड आकारला गेला असेल, तर त्याची संपूर्ण माहिती देखील सादर करणे आवश्यक आहे.
हे ही वाचा: इथे नवऱ्या मुलाची व्हर्जिनिटी तपासते नवरीची 'काकी', आधी काकीसोबत संबंध अन् नंतर मुलीसोबत लग्न!
अधिक माहिती मिळवण्यासाठी काय कराल?
संपूर्ण तपशील, पात्रता अटी आणि अर्जाचा नमुना NIA च्या अधिकृत वेबसाइट www.nia.gov.in/recruitment-notice.htm वर उपलब्ध आहे. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी वेबसाइटला भेट देण्याचा आणि सर्व सूचना वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.