अत्यंत सुंदर दिसणाऱ्या तरुणीचा Live सुरू असतानाच खेळ खल्लास, थेट डोक्यातच...
व्हेलेरिया मार्केझ या 23 वर्षीय तरुणीची लाइव्ह स्ट्रिमिंग सुरू असतानाच डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मॅक्सिकोमध्ये घडली आहे.
ADVERTISEMENT

मॅक्सिको सिटी: एका अत्यंत सुंदर आणि ब्यूटी इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 23 वर्षीय तरुणीची Live स्ट्रिमिंग सुरू असतानाच डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. ही घटना मॅक्सिकोमध्ये घडली असली तरी त्यामुळे संपूर्ण जगात संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या भयंकर घटनेनंतर मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबाम यांनी सांगितले की, सुरक्षा मंत्रिमंडळ सौंदर्यवतीच्या हत्येची चौकशी करत आहे. TikTok वर व्हिडिओ लाईव्ह स्ट्रीम करत असताना तिची हत्या करण्यात आली. 23 वर्षीय व्हेलेरिया मार्केझच्या मृत्यूची चौकशी संभाव्य 'फेमीसाइड' (Femicide) म्हणून केली जात आहे. म्हणजेच एखाद्या पुरूषाने एखाद्या महिलेला किंवा मुलीला लिंगभेदामुळे ठार मारणे.
हे ही वाचा>> बकऱ्या चारणाऱ्या आजोबासोबत न्यूड होऊ अश्लील चाळे करणाऱ्या इंजिनिअर तरुणीची आता खरी कहाणी आली समोर!
या क्रूर हत्येमुळे मेक्सिकोमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळला आहे, जिथे महिलांविरोधात हिंसाचाराचे प्रमाण आधीच जास्त आहे. अध्यक्ष शिनबाम यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, 'या परिस्थितीला जबाबदार असलेल्या आणि त्यामागील हेतू शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. आमचा एकजूटपणा तरुणीच्या कुटुंबासोबत आहे. 13 मे रोजी झॅपोपन शहरात ज्या ब्युटी सलूनमध्ये ती काम करत होती तिथेच मार्केझची हत्या करण्यात आली. एका माणसाने सलूनमध्ये घुसून तिच्यावर गोळ्या झाडल्या.

नेमकी घटना काय?
घटनेच्या काही सेकंद आधी, तरुणीने तिच्या TikTok अकाउंटवरून लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केलं होतं, ज्यामध्ये ती एका टेबलावर बसलेली आणि हातात एक सॉफ्ट टॉय धरलेली दिसत आहे.
हे ही वाचा>> रात्रपाळीला गेलेला पती घरी परतला अन् हादरलाच, भिवंडीत तीन मुलांसह पत्नीने संपवलं आयुष्य...
लाईव्ह स्ट्रीमदरम्यान, ती म्हणत होती की, "ते येत आहेत" त्यानंतर मागून एक आवाज येतो, "अरे, वेल?" लाईव्ह स्ट्रीमवरील आवाज बंद होण्यापूर्वी मार्केझने या आवाजाला "हो" असे उत्तर दिले होते. त्यानंतर काही वेळातच तिला गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

व्हिडिओ संपण्यापूर्वी लाईव्हस्ट्रीममध्ये एका पुरूषाचा चेहरा थोडा वेळ दिसत होता, जो फोनवर बोलताना दिसत आहे.
पॅरामेडिक्स टीमने पुष्टी केली की व्हॅलेरिया मार्केझचा मृत्यू डोक्यात आणि छातीत गोळी लागल्याने झाला. इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर जवळपास 200,000 फॉलोअर्स असलेल्या मार्केझने लाईव्ह स्ट्रीममध्ये सांगितले की, ती सलूनमध्ये नसताना, कोणीतरी तिला एक महागडी भेट देण्यासाठी आले. त्यावेळी मार्केझ ही चिंतेत दिसत होती. ती असंही म्हणालेली की, ती त्या माणसाच्या परत येण्याची वाट पाहत आहे.
मेक्सिकन अधिकाऱ्यांच्या मते, मार्क्वेझची हत्या ही लिंग-आधारित हिंसाचाराची गंभीर घटना असू शकते आणि या आधारावर त्याची चौकशी केली जात आहे. लॅटिन अमेरिकेत लिंग-आधारित हिंसाचार खूप सामान्य आहे, जिथे स्त्रियांवर तिच्या लिंगामुळे हल्ला केला जातो.