Maharashtra Weather Today: धुळे, जळगावमध्ये आज चक्क पडणार पाऊस, तुमच्या जिल्ह्यात कसं असणार हवामान?

मुंबई तक

Maharashtra Weather 19th Mar 2025: राज्यात मागील काही दिवसांपासून तापमान वाढू लागलं आहे. पण आज (19 मार्च) मात्र अनेक जिल्ह्यात आल्हाददायक वातावरण असणार आहे. तसंच उ. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

धुळे, जळगावमध्ये पडणार पाऊस (फोटो सौजन्य: Gork AI)
धुळे, जळगावमध्ये पडणार पाऊस (फोटो सौजन्य: Gork AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका पाऊस

point

गडगडाटी पाऊस पडण्याची देखील शक्यता

point

विदर्भातील काही ठिकाणी विजांसह वादळी वारे

Maharashtra Weather Today (19th Mar 2025): मुंबई: मागील काही दिवसांपासून वातावरण उष्ण होत आहे. मात्र, आज (19 मार्च) मात्र, संपूर्ण राज्यात तापमानचा पारा काहीसा घसरेल. एवढंच नव्हे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची देखील शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वातावरणात फरक पाहायला मिळेल. दरम्यान, काही जिल्ह्यात वादळी वाऱ्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. मार्चच्या सुरुवातीलाच घामाचा धारा सुटू लागल्याने पुढील काही दिवस अधिक उष्ण असतील असा अंदाज अनेक जण व्यक्त करत होते. मात्र, आता हवामान खात्याने वातावरणात काहीशी घसरण होईल असा अंदाज वर्तवला आहे. या संपूर्ण आठवड्यात वातावरण कोरडं आणि आल्हादायक असेल असा अंदाज आहे.

हे ही वाचा>> Jio Cricket Offer : नो टेन्शन! खिसा रिकामा झालाय? जिओ हॉटस्टारवर फ्री मध्ये पाहा IPL, 'हा' आहे जबरदस्त प्लॅन!

दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नंदूरबारमध्ये आज पावसाची शक्यता आहे. विजा आणि गडगडाटी पाऊस या जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. याशिवाय मराठवाड्यातील छ. संभाजीनगर जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे या भागात वातावरण काहीसं थंड असणार आहे.

हवामान विभागाने वर्तवलाय पावसाचा अंदाज

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका पाऊस आणि गडगडाटी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही ठिकाणी विजांसह वादळ आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे.

हे ही वाचा>> Optical illusion : रथी-महारथी थकले! तरीही जंगलात लपलेलं हरीण दिसलं नाही, तुम्ही लावा मेंदूला जोर

कोणत्या जिल्ह्यात वातावरण असेल कोरडं?

19 मार्च 2025 ला पालघर,ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीमध्ये कोरडं वातावरण असेल. तर कोकणात म्हणजेच सिंधुदुर्गात देखील कोरडं हवामान असणार आहे. याचसोबत नाशिक, नशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये देखील कोरडं हवामान असेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp