Maharashtra Weather : मुंबईसह 'या' भागात विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस पडणार! कोणत्या जिल्ह्यात घोंघावणार वादळ?

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानाच्या स्थितीत लक्षणीय बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारा आणि पाऊस पडला होता.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather Today (फोटो- Grok AI)
Maharashtra Weather Today (फोटो- Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या जिल्ह्यात वाहणार वादळी वारे?

point

राज्यातील या भागात पडणार जोरदार पाऊस

point

आजच्या हवामानाबाबत वाचा सविस्तर माहिती

Maharashtra Weather : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानाच्या स्थितीत लक्षणीय बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारा आणि पाऊस पडला होता. मुंबईतही मंगळवारी आणि बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, जालना आणि बीडमध्ये वादळ घोंघावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.

तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज बांधण्यात आला होता. अशातच आज 8 मे रोजी गुरुवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामानाची स्थिती काय असणार? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. 

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कसं असेल आजचं हवामान?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज. काही ठिकाणी ढगाळ आकाश, विजांच्या कडकडाटासह आणि 50-60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. उपनगरातील काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30°C आणि 24°C च्या आसपास असेल.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह (50-60 किमी प्रतितास वेग) गारपीट होण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp