Maharashtra weather : ऐन दिवाळीत वातावरण बदललं, मंगळवारसाठी IMD ची नवी अपडेट

Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवविलेल्या अंदाजानुसार, राज्यात आता एकाही जिल्ह्याला पावसाची शक्यता वर्तविली नाही, 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे..

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल

point

12 नोव्हेंबर रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे..

Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवविलेल्या अंदाजानुसार, राज्यात आता एकाही जिल्ह्याला पावसाची शक्यता वर्तविली नाही. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या चारही विभागांत कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही, अशातच जाणून घेऊयात 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे..

हे ही वाचा : नागपूर: फटाक्यांवरून वाद, चाकूने सपासप वार करत तरुणाची केली हत्या

राज्यात काही दिवसांपासून वातावरण बदल झालेला दिसून आला. काही भागांत हवामानाचा चढ-उतार पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच रात्री गारवा जाणवण्याची दाट शक्यता आहे. 

कोकण 

कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोणताही इशारा जारी केलेला नाही. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने कोणताही अलर्ट दिलेला नाही.

मराठवाडा

मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या आठही जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी उष्णता वाढण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : नागपूर: सुनेनं सासूचं सोनं केलं चोरी अन् विकत घेतला iPhone नंतर..

विदर्भ 

विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही. त्यामुळे विदर्भात सर्व जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच रात्री हवेत गारवा होण्याची शक्यता आहे.