कोकण भागातील 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, पुण्यासह काही भागातील धरणातून पाण्याच्या विसर्गाचा धोका
Maharashtra Weather : हवामान विभागाने 10 ऑगस्ट रोजी हवामानाचा सविस्तर अंदाज जाहीर केला आहे, जाणून घेऊयात पावसाची एकूण परिस्थिती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हवामानाचा सविस्तर अंदाज जाहीर
ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी-अधिक
Maharashtra Weather : हवामान विभागाने 10 ऑगस्ट रोजी हवामानाचा सविस्तर अंदाज जाहीर केला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने राज्यात दरवर्षीच्या तुलनेत लवकर प्रवेश केला आहे. मात्र, असे असले तरीही, ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी-अधिक राहण्याची शक्यता आहे. अशातच हवामान विभागाने एकूण मान्सूनच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.
हे ही वाचा : नवरा गेला नदीवर अंघोळ करायला, बॉयफ्रेंडनं पत्नीला गाडीत बसवलं अन्...पती आला रडकुंडीला
कोकण :
राज्यातील कोकण भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागांमध्ये काही ठिकाणी 50-70 मिमी पावसाची शक्यता आहे. विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अधिक पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.










