पतीसमोरच प्रियकरासोबत ठेवले शारीरिक संबंध; नंतर असं काही घडलं ज्याचा तुम्ही विचारही...
छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यात एका महिलेने प्रियकरासोबत मिळून तिच्या पतीची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांना आरोपी महिलेवर संशय आल्यानंतर संबंधित प्रकरणाचा खुलासा करण्यात आला.

बातम्या हायलाइट

पतीसमोरच प्रियकरासोबत ठेवले शारीरिक संबंध

पतीची केली हत्या अन् नंतर त्याच्या मृतदेहासोबतच...
Crime News: छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका महिलेने प्रियकरासोबत मिळून तिच्या पतीची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांना आरोपी महिलेवर संशय आल्यानंतर संबंधित प्रकरणाचा खुलासा करण्यात आला. मृत पावलेल्या व्यक्तीच्या पत्नीचे त्याच गावातील पेशाने मेकॅनिक असलेल्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. याच कारणामुळे दोघे पती-पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे.
गावातील तरुणासोबत अनैतिक संबंध
गरियाबंद जिल्ह्यातील पाण्डुका क्षेत्रात ही घटना घडल्याची बातमी समोर आली. येथील कोपरा नगर पंचायतीचे रहिवासी असलेल्या चुम्मन साहू आणि प्रतिमा साहू यांचं 4 वर्षांपूर्वी एकमेकांसोबत लग्न झालं होतं. या दाम्पत्याला 1 वर्षाची मुलगी आणि 2 वर्षांचा मुलगा अशी दोन मुलं आहेत. याच गावाचा रहिवासी असलेल्या दौलत पटेल नावाच्या तरुणासोबत प्रतिमाचे विवाहबाह्य संबंध होते. दौलत हा इलेक्ट्रिकल मेकॅनिक म्हणून कार्यरत असून तो बऱ्याचदा वीजेच्या कामासाठी चुम्मनच्या घरी जायचा. दौलत आणि प्रतिमा म्हणजेच चुम्मनच्या पत्नीचे गेल्या दीड वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू होते. याबद्दल महिलेच्या पतीला कळल्यानंतर त्या दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे आणि त्यात चुम्मन प्रतिमाला मारहाण देखील करायचा.
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या
पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल मिळताच पतीचा संताप वाढू लागला आणि त्यांच्यात सतत वाद सुरू झाले. याच कारणामुळे प्रतिमाने तिच्या पतीला जीवे मारण्याचा कट रचला. यासाठी तिने 25 जुलैच्या रात्री महिलेच्या प्रियकराने तिच्या पतीला भरपूर दारू पाजली आणि तो बेशुद्ध झाल्यावर त्याला घरी सोडले. त्यानंतर आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराने मिळून दौलतचं उशीने तोंड दाबून त्याची हत्या केली. आरोपींसोबतच्या चौकशीनंतर महिलेचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध सुरू असल्यामुळे तिचा पती तिला नेहमी मारहाण करायचा. तसेच, आरोपी महिला तिच्या प्रियकरासोबत राहू इच्छित होती. यामुळेच त्या दोघांनी चुम्मनला मारण्याचा कट रचला.
हे ही वाचा: "मी तिचा पहिला रुग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर..." अभियंत्याने लिहिली 'ती' कहाणी अन् हॉटेलमध्येच संपवलं आयुष्य...
हत्येनंतर पतीच्या मृतदेहासोबत झोपली
पतीची हत्या केल्यानंतर, महिलेचा प्रियकर निघून गेला आणि पत्नी रात्रभर तिच्या पतीच्या मृतदेहासोबत झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने कुटुंबातील सदस्यांसमोर रडण्याचे नाटक केले. कुटुंबातील जास्त दारू पिल्याने मृत्यू झाल्याचं सदस्यांनी गृहीत धरलं आणि त्यांनी अंत्यसंस्कार केले. यानंतर, दशगात्र विधीच्या आधी सासरच्यांना संशय आला आणि ते पोलिस स्टेशनमध्ये गेले. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराची काटेकोरपणे चौकशी केली असता दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर त्या दोघांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
हे ही वाचा: प्रेम, विश्वासघात आणि जादूटोणा... पतीपासून वैतागलेली तबस्सुम प्रियकराच्या नादात नको ते करुन बसली!
पोलिसांनी प्रतिमाला अटक केली असता त्यावेळी ती हसत होती. तिच्या हसण्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. चौकशीदरम्यान प्रतिमाने सांगितले की, तिचा नवरा दारूच्या नशेत तिला दररोज मारहाण करायचा. त्यामुळे तिने दौलतशी प्रेमसंबंध निर्माण केले. प्रकरणासंबंधी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने तिच्या पतीसमोर आपल्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचं महिलेनं कबूल केलं.