नात्याला काळीमा! नराधम बापाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, नवजात बाळाला जंगलात फेकलं अन् नंतर घडलं...

Shocking Viral News : मध्यप्रदेशच्या खरगाने जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. येथील एका नराधम बापाने त्याच्या 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केला.

प्रतिकात्मक चित्र.
प्रतिकात्मक चित्र.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नराधम बापाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

point

नवजात अर्भकाला जंगलात फेकून दिलं आणि नंतर...

point

पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती

Shocking Viral News : मध्यप्रदेशच्या खरगाने जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. येथील एका नराधम बापाने त्याच्या 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलगी प्रेग्नंन झाल्यावर तिने बाळाला जन्म दिला. त्यानंतर आरोपीने नवजात बालकाला झाडीत फेकलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

क्षेत्रीय पोलीस स्टेशनचे प्रभारी (एसएचओ) जगदीश गोयल यांनी म्हटलंय की, हे प्रकरण या आठवड्याच्या सुरुवातील उघडकीस आलं. जेव्हा महेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका गावातील झाडीत एका नवजात बालक सापडलं. रिपोर्ट्सनुसार, नवजात बालकाला जिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वी त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले. याप्रकरणी एका अज्ञात व्यक्ती विरोधात आयपीसीच्या कलम 93 (बारा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला सोडून देणं) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> 'दिल्लीत दोघेजण भेटले आणि त्यांनी 160 जागांची गॅरंटी दिली अन्...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती

पोलीस अधीक्षक धर्मराज मीणा यांनी म्हटलं की, तपासात समोर आलं की, त्या नवजात बालकाची आई 16 वर्षांची मुलगी होती. तिला एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पीडित मुलीनं पोलिसांना सांगितलं की, तिच्या वडिलांनी गुजरातच्या राजकोटमध्ये मजुरीचं काम करत असताना तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ती प्रेग्नंट झाली. एसपीने म्हटलं की, आरोपीने पीडितेची प्रसुती घरीच केली आणि जेव्हा ती बेशुद्ध झाली. तेव्हा तिने बाळाला झाडीत फेकलं आणि तो पळून गेला. 

पोलिसांनी शुक्रवारी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्यांनी म्हटलं की, नवजात बालक, पीडित मुलगी आणि आरोपीचा डीएनए तपासलं जाणार आहे. डॉ. पवन पाटीर यांनी दिलेली माहिती अशी की, सुरुवातीला या बाळावर खरगोन येथे उपचार सुरु होते. आता या बाळाला इंदौरच्या एमटीएच रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. बाळ आता व्हेंटिलेटवर उपचार घेत आहे. 

हे ही वाचा >> मुंबईतील सुंदर महिलेचा तो कारनामा अन् एक्स बॉयफ्रेंडला... शरीरसंबंध की भलतंच काही...

हे वाचलं का?

    follow whatsapp