मुंबईतील सुंदर महिलेचा तो कारनामा अन् एक्स बॉयफ्रेंडला... शरीरसंबंध की भलतंच काही...

मुंबईतील महिलेने एक धक्कादायक प्रकार केल्याचं उघकीस आलं आहे. संबंधित महिलेने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला अत्याचाराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि त्याच्याकडून एक कोटी रुपये मागितले.

"एक करोड दे नाहीतर..." मुंबईतील महिलेचा तो कारनामा अन् एक्स बॉयफ्रेंडला...
"एक करोड दे नाहीतर..." मुंबईतील महिलेचा तो कारनामा अन् एक्स बॉयफ्रेंडला...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलेनं एक्स बॉयफ्रेंडकडून केली 1 कोटी रुपयांची मागणी

point

लैंगिक शोषण केल्याच्या खोट्या आरोपाखाली अडकवलं अन्...

Mumbai Crime: मुंबईतील महिलेने एक धक्कादायक प्रकार केल्याचं उघकीस आलं आहे. यामध्ये एक कोटी रुपयांची खंडणी, लैंगिक आत्याचाराचा खोटा आरोप, मोबाईल-ईमेल हॅकिंग आणि धमकीचे मॅसेज यांचा समावेश आहे. ही घटना सायको-थ्रिलर पेक्षा कमी नाही. प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव डॉली कोटक असल्याचं समोर आलं आहे. ती मुंबईतील एका प्रतिष्ठित बँकेत नोकरी करत असल्याची माहिती आहे. डॉलीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला अत्याचाराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि त्याच्याकडून एक कोटी रुपये मागितले.

डॉली कोटकने तिच्या आधीच्या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी मोठा कट रचला. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉलीने आधी तिच्या एक्स बॉयफ्रेंडचा मोबाईल आणि फोन हॅक केला. या सगळ्यात तिने तिच्या बँकेतील इतर 3 कर्मचाऱ्यांची मदत घेतली. या टीममध्ये HDFC आणि ICICI बँकेतील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. डॉलीने तिच्या प्रियकराचे खाजगी फोटो, चॅट्स, त्याच्या पत्नीची माहिती आणि GPS लोकेशन काढून ब्लॅकमेल करण्याचा कट रचला. 

"एक करोड दे नाहीतर तुरुंगात सडशील..."

मिळालेल्या वृत्तानुसार, डॉलीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला धमकीचे मॅसेज पाठवले. त्यावेळी ती म्हणाली, "जर एक कोटी रुपये दिले नाहीस तर मी तुला लैंगिक शोषण केल्याच्या खोट्या आरोपाखाली अडकवेन आणि तु जेलमध्ये सडत राहशील. पोलिसांना याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केलास तर तुझी पत्नी आणि बहिणीची इज्जत सुद्धा राहणार नाही." इतकेच नव्हे तर एका वकिलामार्फत तिने तिच्या प्रियकराला भेटायला बोलावलं आणि खंडणीची पुन्हा मागणी केली. तिने त्या माणसाच्या मॅनेजरला मेल पाठवून त्याची बदनामी केली, ज्यामुळे त्याला त्याची नोकरी गमवावी लागली.

हे ही वाचा: Maharashtra Politics: प्रियंका चतुर्वेदींची PM मोदींशी भेट नक्कीच सहज नाही, नवा डाव रचलाय पण खेळी कोण आणि कधी...

कोर्टात पोहचला आणि रॅकेटचा पर्दाफाश

नोकरी गमावल्यामुळे आणि बदनामी झाल्याने पीडित तरुण अखेर बोरिवलीच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यानंतर धक्कादायक बाबी उघडकीस येऊ लागल्या. चारकोप पोलिसांनी डॉलीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिचा भाऊ सागर कोटक, महिला सहकारी प्रमिला वाज आणि तीन बँक कर्मचाऱ्यांवर देखील आरोप लावण्यात आले आहेत. या व्यक्तींवर सरकारी डेटाची चोरी, हॅकिंग आणि बळजबरीने खंडणीची मागणी यांसारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. 

हे ही वाचा: Govt Job: 'या' सरकारी बँकेत निघाली मोठी भरती, काय आहे पात्रता? आत्ताच करा अप्लाय

आधीसुद्धा केले असेच कारनामे

डॉलीचं अशा गुन्ह्यामध्ये नाव येणं, ही पहिलीच वेळ नाही. तर डीबी मार्ग पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या आणखी एका गुन्ह्यात ती मुख्य आरोपी असून त्यात एका व्यावसायिकाकडून पैशाची मागणी करण्यात आली होती. तिचा भाऊ सागर कोटक हा 17 वर्षांच्या मुलीचे अपहरण आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आधीच पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपी आहे आणि सध्या तो जामिनावर आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp