नालासोपारा : लपाछपीचा खेळ 8 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला, 4 दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह
Nalasopara News : नेहमीप्रमाणे काही वेळात तो घरी परत येईल, अशी अपेक्षा कुटुंबाला होती. मात्र अनेक तास उलटून गेल्यानंतरही मेहराज परतला नाही, त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नालासोपारा : लपाछपीचा खेळ 8 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला
4 दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह
Nalasopara News : नालासोपारा परिसराला हादरवून टाकणारी घटना सोमवारी सकाळी समोर आली. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मेहराज शेख (वय 8) या चिमुकल्याचा मृतदेह एका बांधकामाधीन इमारतीतील पाण्याच्या टाकीत आढळला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तो मित्रांसोबत लपाछपी खेळताना चुकून टाकीत कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
3 डिसेंबर रोजी बेपत्ता झाला मेहराज
नालासोपारा पश्चिमेतील टाकीपाडा परिसरातील कारारीबाद येथील चाळीत मेहराज कुटुंबासोबत राहत होता. ३ डिसेंबरच्या दुपारी तो खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. नेहमीप्रमाणे काही वेळात तो घरी परत येईल, अशी अपेक्षा कुटुंबाला होती. मात्र अनेक तास उलटून गेल्यानंतरही मेहराज परतला नाही, त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.
सातत्याने शोध, पण निष्फळ
कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी परिसरात रात्रभर शोध घेतला, पण मुलाचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर 4 डिसेंबर रोजी मेहराजची आई नालासोपारा पोलिस ठाण्यात धाव घेऊन मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली. चौकशीसाठी गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती.
सोमवारी सकाळी टाकीत तरंगताना मृतदेह










