कला केंद्रातील नर्तिकेसाठी धाराशिवच्या युवकाची आत्महत्या, देवदर्शनाहून येताना वाद झाल्याने गळफास घेतला
Dharashiv Crime : दोघेही देवदर्शन करून परत आल्यानंतर किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यातूनच त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. यापूर्वीही वैरागच्या सासुरेमध्ये बीडमधील एका युवकाने नर्तिकेच्या नादात जीव घेतल्याची घटना घडली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कला केंद्रातील नर्तिकेसाठी धाराशिवच्या युवकाची आत्महत्या
देवदर्शनाहून येताना वाद झाल्याने गळफास घेतला
Dharashiv Crime : नर्तिकेचा हट्ट पुरवताना आर्थिक झळ बसून कर्जबाजारी झालेल्या बीडमधील उपसरपंचाने आत्महत्या केल्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली होती. या प्रकरणात नर्तिकेला तुरुंगात देखील जावं लागलं होतं. काही दिवसांपूर्वीच तिला जामीन मिळालाय. मात्र, आता धाराशिवमध्ये देखील नर्तिकेसोबत झालेल्या वादानंतर एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
धाराशिव येथे कला केंद्रात काम करणाऱ्या एका महिलेसोबतच्या प्रेमसंबंधातून झालेल्या वादानंतर एका तरुणाने गळफास घेऊन जीव दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव अश्रुबा कांबळे असून, दोघेही देवदर्शन करून परत आल्यानंतर किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यातूनच त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. यापूर्वीही वैरागच्या सासुरेमध्ये बीडमधील एका युवकाने नर्तिकेच्या नादात जीव घेतल्याची घटना घडली होती.
हेही वाचा : एक्सप्रेस वेवर कारमध्ये जोडप्याचे शारीरिक संबंध... 'या' व्यक्तीने 'तो' व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप
धाराशिवमधील साई कला केंद्रात नृत्य करणाऱ्या महिलेचा तिच्या प्रियकर अश्रुबा कांबळेसोबत वाद झाला होता. वादाच्या भरात अश्रुबाने आत्महत्या करण्याची धमकी दिली, आणि काही वेळातच त्याने प्रत्यक्षात गळफास घेऊन जीव दिला. अश्रुबा अंकुश कांबळे (वय 25) हा रुई ढोकी गावचा रहिवासी असून, गेल्या पाच वर्षांपासून त्या नर्तिकेसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. दोघेही शिखर शिंगणापूर येथे देवदर्शन करून परत येत असताना त्यांच्यात वाद झाला.










