ग्राहकांनो! रक्षाबंधन साजरा करताय? पुन्हा सोन्याचे दर कडाडले, तुमच्या शहरातील आजचे भाव तर वाचा एकदा
Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात सतत वाढ होत असल्याने ग्राहक सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या भावात किती रुपयांनी झाली वाढ?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत 1 तोळा सोन्याचे आजचे दर किती?
Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात सतत वाढ होत असल्याने ग्राहक सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत. आंतराष्ट्रीय बाजारात चढ-उतार आणि अमेरिकी डॉलरच्या मजबुतीचा थेट परिणाम भारतीय बाजारांवर होत असतो.
दरम्यान, गोल्डवर लागणारं शुल्क सराफा बाजारात सप्लाय आणि डिमांडवर आधारित असतं. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 100490 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 95700 रुपये झाले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 103040 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 94450 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 103040 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 94450 रुपये झाले आहेत.










