Maharashtra Weather: ऑगस्ट महिन्यात कोकणातील 'या' भागांत मान्सूनचा लपंडाव, येलो अलर्ट जारी

maharashtra weather today : भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) आणि इतर हवामान विभागाने 9 ऑगस्ट रोजी हवामानाबाबत महत्त्वाची शक्यता जारी केली आहे.

maharashtra weather (grok)
maharashtra weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

point

हवामानाबाबत महत्त्वाची अपडेट

Maharashtra Weather : भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) आणि इतर हवामान विभागाने 9 ऑगस्ट 2025 रोजी हवामानाबाबत महत्त्वाची शक्यता जारी केली आहे. सध्याचा मान्सून हा अनुकूल परिस्थितीत असल्याने राज्यातील एकूण सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे, परंतु ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर काही अंशी कामी झाला आहे. याचपार्श्वभूमीवर 9 ऑगस्ट रोजी हवामान खात्याने पावसाच्या एकूण परिस्थितीतवर भाष्य केले आहे.

हे ही वाचा : कल्याणमध्ये मसाज पार्लरच्या नावाने बंद खोलीत सुरु होतं भलतंच कांड, पोलिसांकडून भांडाफोड

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र :

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसह कोकणात 9 ऑगस्ट रोजी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने रत्नागिरीला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

मराठवाडा आणि विदर्भ :

मराठवाडा आणि विदर्भातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नागपूर आणि चंद्रपूरसह या भागात ढगाळ वातावरण राहील, परंतु पाऊस हलक्या स्वरूपाचा असेल. काही ठिकाणी दुपारनंतर तुरळक सरी पडण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अंदाज जाहीर केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नागपूर आणि चंद्रपूरसह काही राज्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे आणि मध्य महाराष्ट्र : 

पुणे आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सांगली येथे ढगाळ वातावरणामुळे तापमानात काहीशी घट होईल, परंतु पाऊस मर्यादित स्वरूपात असेल. तापमान 24 ते 28 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे घाट परिसर, सातारा घाटमाथा, सातारा, सांगली आणि कोल्हापूरात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

हे ही वाचा : विकृतीचं टोक! महिला शौचासाठी गेली जंगलात, ट्रॅक्टरवाल्यांची पडली वाईट नजर, अन् सर्वांनी मिळून तिथेच...

उत्तर महाराष्ट्र : 

तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव येथे हलक्या पावसाची शक्यता आहे, परंतु तापमान 30 अंशांपेक्षा जास्त राहू शकते.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp