'नेत्याचे' प्रेयसीसोबत शारीरिक संबंध सुरू असतानाच आली पत्नी, पती पळाला.. गर्लफ्रेंड सापडली, कुटूनच काढलं!
मध्य प्रदेशातील रीवा परिसरातील एक सोसायटीमध्ये पत्नीने तिच्या नवऱ्याला रात्री उशीरा प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं. आरोपी व्यक्ती OBC महासभाचे प्रदेशाध्यक्ष असून सरकारी नोकरी सुद्धा करत असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीने पतीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं....
नेत्याचे प्रेयसीसोबत विवाहबाह्य संबंध अन्...
Extra Marital Affair: मध्य प्रदेशातील रीवा परिसरातील एक सोसायटीमध्ये पत्नीने तिच्या नवऱ्याला रात्री उशीरा प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं. पीडित महिलेचा नवरा आणि त्याची प्रेयसी दोघे आक्षेपार्ह स्थितीत असल्याचं आढळून आलं. अचानक पत्नीला पाहिल्यानंतर पतीने लगेच पॅन्ट घातली आणि तिसऱ्या मजल्यावरुन पाइपच्या आधारे खाली उतरुन पळून गेला. संबंधित प्रकरणाचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.
प्रकरणातील आरोपी व्यक्तीचं नाव पप्पू कन्नौजिया असल्याची माहिती आहे. ही व्यक्ती OBC महासभाचे प्रदेशाध्यक्ष असून सरकारी नोकरी सुद्धा करत असल्याचं सांगितलं जात आहे. पप्पू कन्नौजियाचं बऱ्याच काळापासून एक महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा दावा केला जात आहे. याच कारणामुळे आरोपीची पत्नी नेहमी त्याच्यावर लक्ष ठेवून असायची.
पतीला दुसऱ्या महिलेसोबत पकडलं
एके दिवशी रात्री उशीरा पीडित महिलेला तिचा पती पीएम आवास कॉलनीमध्ये त्याच्या प्रेयसीसोबत असल्याची माहिती मिळाली. त्याच वेळी महिला तिथे पोहचली आणि आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत मजा मारताना तिने पाहिलं. त्यावेळी दोघे सुद्धा आक्षेपार्ह स्थितीत होते. यानंतर पत्नी संतापली आणि तिने गोंधळ घातला.
पाइपच्या साहाय्याने खाली उतरला अन्...
पत्नीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर पप्पू कनौजिय फ्लॅटच्या मागील मार्गावरील पाइपच्या साहाय्याने खाली उतरला आणि तिथून पळून गेला. मात्र, या नेत्याची प्रेयसी पकडली गेली. त्यावेळी पीडित महिला आणि पप्पूच्या प्रेयसीमध्ये मोठं भांडण झालं आणि गोंधळ ऐकताच परिसरातील लोक जमले.










