मुंबईची खबर: गुरूवारपासून सलग 4 सुट्ट्या... मध्य रेल्वेकडून मुंबईकरांसाठी मोठं गिफ्ट
सणासुदीच्या काळात येत्या शनिवारी आणि पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या कर्मचाऱ्यांना मिळणार असून रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या गर्दीची संभव्यता लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून 18 विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सणासुदीच्या काळात मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार
मध्य रेल्वेकडून '18' विशेष गाड्यांची घोषणा!
Mumbai News: येत्या आठवड्यात येणाऱ्या सणांमुळे अनेक जण गावी किंवा फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत असल्याचं पाहायला मिळतंय. येत्या गुरुवारी पतेती, शुक्रवारी स्वातंत्र्यदिन, शनिवारी गोपाळकाला आणि रविवार अशा सलग 4 सुट्ट्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हीच संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून 18 विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.
लॉन्ग विकेंड मिळाल्यामुळे ऑफिसचे बरेच कर्मचारी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत आहेत. अशातच, मध्य रेल्वेने काही विशेष गाड्यांचं नियोजन केलं असून प्रवाशांच्या मागणीनुसार, 'या' विशेष गाड्या धावणार आहेत.
1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते नागपूर (सहा फेऱ्या)
2. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव (चार फेऱ्या)
3. सीएसएमटी (CSMT) ते कोल्हापूर (दोन फेऱ्या)
4. पुणे ते नागपूर (सहा फेऱ्या)
गाडी क्र. 01123/4 सीएसएमटी (CSMT)- नागपूर- सीएसएमटी (CSMT)
22 डबे असलेली ही गाडी 9 ऑगस्ट रोजी सीएसएमटीहून मध्यरात्रीनंतर 12:30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3:30 वाजता नागपुरात पोहचेल. 10 ऑगस्टला पुन्हा तिथून दुपारी 2:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:25 सीएसएमटीला पोहचेल.










