Maharashtra Weather: आज नारळी पौर्णिमा.. दर्याराजा शांत होणार की खवळणार? पाहा महाराष्ट्रातील हवामान
Maharashtra Weather Today: आज नारळी पौर्णिमा असल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील जाणून घ्या कसं असेल महाराष्ट्रातील नेमकं वातावरण.
ADVERTISEMENT

मुंबई: भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार आज (8 ऑगस्ट) महाराष्ट्रात विविध भागांमध्ये मिश्र स्वरूपाचे हवामान पाहायला मिळेल. पावसाचा जोर कायम असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकण, मराठवाडा, आणि विदर्भातील काही भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाचा अंदाज आहे.
कोकण आणि गोवा
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी: या भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू आहे, आणि 24 तासांत काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
विशेष सूचना: कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग 40-50 किमी प्रतितास असू शकतो, त्यामुळे मासेमारीसाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.










